आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Apple To End Google's Monopoly, Prepare For Own Search Engine; The IPhone Started Showing The Results Of Apple Instead Of Google

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अ‍ॅपल संपवणार गुगलची एकाधिकारशाही, स्वत:च्या सर्च इंजिनची तयारी; आयफोन दाखवू लागला गुगलऐवजी अ‍ॅपलचे रिझल्ट

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्च इंजिन बनवणे सोपे नाही, चुकीचा मॅप तयार केल्याने गेली होती नोकरी

तंत्रज्ञानात अव्वल असलेल्या गुगलला आव्हान देण्यासाठी अ‍ॅपलने आता पाऊल उचलले आहे. वास्तविक कंपनीने अशातच आयफोनच्या नवीन मॉडेलमध्ये आयओएस १४ या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल केले आहेत. फायनान्शियल टाइम्सनुसार, आयओएस १४ मधील काही सर्च फंक्शनमध्ये गुगलचा समावेश नाही. आयफोनच्या होम स्क्रीनवर (टुडे व्ह्यू)उजव्या बाजूला स्वाइप केल्यानंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये सर्च केल्यास गुगल रिझल्टऐवजी अ‍ॅपल जनरेटेड लिस्ट दाखवली जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, वेब सर्चची ही क्षमता अ‍ॅपलच्या इनहाऊस विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, अ‍ॅपलने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

वास्तविक, आपले अंतर्गत प्रकल्प गोपनीय ठेवण्यात अ‍ॅपल कुख्यात आहे. मात्र, हे नवे पाऊल पाहता स्पष्ट होत आहे की अ‍ॅपल आता गुगल सर्च इंजिनचा प्रतिस्पर्धी तयार करत आहे. अडीच वर्षांपूर्वी अ‍ॅपलने गुगल सर्चचे प्रमुख जॉन गियान्नांड्रिया यांना आपल्या ताफ्यात घेतले होते. तेव्हा असे वाटले होते की, कंपनी आता आपली आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षमता आणि सिरी व्हर्च्युअल असिस्टंट भक्कम करत आहे. परंतु, अ‍ॅपलचे लक्ष जॉनच्या वेगळ्याच कौशल्यावर होते. गियान्नांड्रियांकडे गुगल सर्च इंजिन आठ वर्षे चालवण्याचा अनुभवही होता. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने अ‍ॅपलविरुद्ध एक गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅपलमध्ये सर्च इंजिन म्हणून आपल्याला कायम ठेवावे म्हणून गुगलने अ‍ॅपलला प्रचंड रक्कम (५८ हजार कोटी ते ८७ हजार कोटी) दिल्याचे हे प्रकरण आहे. अ‍ॅपलच्या सर्च इंजिनिअर जॉबसाठी काढलेल्या जाहिरातीमध्येही हेच संकेत आहेत.

सर्च इंजिन बनवणे साेपे नाही, चुकीचा मॅप तयार केल्याने गेली हाेती नाेकरी

सर्च इंजिन तयार करणे साेपे नाही. २०१२ मध्ये गुगलशी स्पर्धेच्या नादात अ‍ॅपलला बराच फटका बसला हाेता. तेव्हा अ‍ॅपल मॅपमध्ये इतक्या चुका हाेत्या की उच्चाधिकारी स्काॅट फाेरस्टाल यांना स्टीव्ह जाॅब्ज यांच्यासमाेर राजीनामा द्यावा लागला हाेता. मात्र, आता अ‍ॅपलकडे इंडेक्स वेब तयार करण्याइतपत संसाधने आहेत.

बातम्या आणखी आहेत...