आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Apple Updates Cheap Smartphone SE And IPad With FiveG; The Apple 13 Will Also Be Available In Green|Marathi News

दिव्य मराठी विशेष:अ‍ॅपलने स्वस्तातला स्मार्टफोन एसई अन् आयपॅडला फाइव्ह जीसोबत केले अपडेट; अ‍ॅपल -13 हिरव्या रंगातही मिळणार

सॅन फ्रॅन्सिस्को7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने या वर्षातील पहिल्याच इव्हेंटमध्ये नवनवे फीचर्स, सुविधा सादर केल्या. आता आयफोन १३ आणि आयफोन १३ प्रो अल्पाइन हिरव्या रंगातही मिळणार आहे. कंपनीने स्वस्त, परवडणारा आयफोन एसई आता नव्या फीचर्ससह बाजारात आणला आहे.

अमेरिकत त्याची किंमत किमान ४२९ डॉलर (सुमारे ३३ हजार रुपये) आहे. आता हे मॉडेल फाइव्ह जी सपोर्ट आणि कंपनीच्या नव्या प्रोसेसर ए-१५ बायोनिक चिपसेटसह मिळणार आहे. तथापि, याच्या डिझाइनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. आता यामध्ये ४.७ इंच डिस्प्ले, टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर असेल तसेच मागील बाजूस १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. त्यासोबतच बॅटरीही अपडेट केली आहे. हा फोन अमेरिकत १८ मार्च रोजी उपलब्ध होणार आहे.

छोट्या फोनची आवड असणाऱ्यांसाठी हे मॉडेल आदर्श आहे, असे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक म्हणाले. त्यासोबतच अ‍ॅपलने २७ इंच डिस्प्ले असलेला नवा स्टुडिओ एम वन अल्ट्रा चिपसह लाँच केला आहे. मध्यम श्रेणीमधील आयपॅडमध्येही आता एम वन चिप असेल. अ‍ॅपलने आपल्या मध्यम श्रेणीतील आयपॅड, आयपॅड एअरचे नवे व्हर्जन बाजारात आणले आहे. या आयपॅडमध्ये आता एम वन प्रोसेसर आणि फाइव्ह जी सपोर्ट सिस्टिम असेल. याआधी ही चिप अ‍ॅपल अ‍ॅडव्हान्स आयपॅड प्रो आणि मॅकबुक एअर मॉडेलमध्येच समाविष्ट होती. याचा फ्रंट कॅमेरा अपग्रेड करण्यात आला असून तो आता १२ मेगा पिक्सल कॅमेरा अन् वाइड अँगल सुविधेसह मिळेल.

प्रोसेसरचा वेग दुपटीने वाढणार
आयपॅडमधील बदलांमुळे प्रोसेसरचा वेग दुपटीने वाढणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. तथापि आयपॅडच्या किमती पूर्वीप्रमाणेच राहतील. त्यात बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी आयपॅड एअर मॉडेल सन २०२० मध्ये अपडेट करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...