आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅपलच्या अमेरिकेतील एका स्टोअरमधील कर्मचार्यांनी युनियनसाठी मतदान केले. अॅपलच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन होणार आहे. युनियनची स्थापना झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, कामाचे तास आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींवर युनियन कंपनीशी थेट बोलू शकेल.
कर्मचाऱ्यांचा समूह AppleCORE ने (संघटित रिटेल कर्मचार्यांची संघटना) युनियनसाठी प्रचार केला होता. त्यानंतर मतदान झाले. निवडणूक आयोजित करणाऱ्या फेडरल एजन्सीनुसार, मेरीलँड स्टोअरच्या 110 कर्मचाऱ्यांपैकी 65 कर्मचाऱ्यांनी बाजूने आणि 33 कर्मचाऱ्यांनी विरोधात मतदान केले. 12 कर्मचाऱ्यांनी मतदान केले नाही.
जिंकल्यानंतर AppleCORE ने ट्विट केले, ‘युनियनच्या बाजूच्या मतांचा विजय झाला आहे! ज्यांनी ज्यांनी त्यासाठी मेहनत घेतली किंवा सहकार्य केले त्या सर्वांचे आभार. आता आपण आनंद साजरा करुयात... तसेच पुढील काळातही आपण एकत्र राहूयात.’ या निवडणुकीनंतर अॅपलने यावर कोणतही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
युनियन स्थापन करण्याचा यापूर्वीही झाला होता प्रयत्न
या वर्षी युनियनसाठी मतदान प्रक्रिया राबवणारे हे तिसरे अॅपलचे स्टोअर आहे. मात्र, युनियनच्या बाजूने मतदान झालेले हे पहिलेच स्टोअर ठरले आहे. अटलांटा आणि न्यूयॉर्कमधील इतर अॅपल स्टोअर्सने देखील युनियन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, कंपनी युनियनच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत अटलांटामधील कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
युनियन दोन प्रकारे तयार करता येते
अनेक युरोपीय देशांप्रमाणे यूएसमध्ये युनियन्स सामान्यता तयार होत नाहीत, परंतु तरी देखील कायदा युनियनला संरक्षण प्रदान करतो. युनियन तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. कंपनी स्वतः युनियनला मान्यता देऊ शकते किंवा 30% कर्मचार्यांची त्यासाठी स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, तसे असेल तरच नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड (NLRB) युनियनसाठी निवडणुका घेऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.