आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानसीआरबीच्या डेटानुसार २०२० मध्ये ५० हजारांहून जास्त सायबर गुन्हे दाखल झाले. त्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बँकिंग फसवणूक, एटीएम फसवणूक, क्रेडिट व डेबिट कार्ड फसवणूक आणि ओटीपीने फसवणुकीचा समावेश आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी हवीच..
फोन नेहमीच अपडेट ठेवा
-डेटा संपू नये यासाठी अनेकदा यूजर्स मोबाइल अपडेट करत नाहीत. मात्र सायबर तज्ञांनुसार त्यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो.
-धोकादायक ठरू शकेल असे अॅप तुम्ही डाऊनलोड तर केले नाही ना? माहित करून घेण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जावे लागेल. प्ले स्टोअरच्या टॉपमध्ये प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करताच प्ले प्रोटेक्टचा पर्याय दिसेल. येथून मोबाइलमधील धोकादायक अॅपबद्दल माहिती मिळते.
-ओपन वायफाय कनेक्शननेे मोबाइल कनेक्ट करण्यापासून वाचा. पासवर्डशिवाय इंटरनेट वापरण्यास मिळेत असेल तर सावधान. त्यामुळे तुमचा पर्सनल डेटा हॅक करून बँकिंग वा इतर फसवणूक होऊ शकते.
-सोशल मिडीया जसे की फेसबुक, इन्स्टाग्रामवर मित्रांच्या नावाने बनावट आयडी बनवून हॅकर्स तुमच्याकडे पैसे मागू शकतात. त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी आधी एकदा बिनदिक्कतपणे मित्राला फोन करून विचारा.
-हॅकर कॉलवर तुम्हाला नावाने हाक मारतात. ओळखले का, विचारतात. तुम्हाला माहित असणारी नावेच ते सांगतात. अशावेळी तुम्ही हो म्हणता. ते पुन्हा विचारतात, कुठून पैसे मागवायचे आहेत काय? त्यानंतर तुमच्या नंबरवर ओटीपी पाठवून फसवणूक होते. तुमच्या खात्यावर पैसे येतात तेव्हा ओटीपी तुमच्या नंबरवर येत नाही, हे नेहमीच लक्षात असू द्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.