आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मुलाखत:5 जीचा परिणाम : उत्पादकतेमध्ये 10 पट वाढ होईल, नवी औद्योगिक क्रांती येईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 5 जीचे भविष्य काय असेल हे सांगत आहेत सीओएआयचे महासंचालक

हे वर्ष 5 जी तंत्रज्ञानाचे आहे. 5 जी आल्याने आपल्या मोबाइल इंटरनेटचा वेग तर वाढेलच, शिवाय देशाच्या औद्योगिक उत्पादकतेत सुमारे १० पटीपर्यंत वाढ होईल. 5 जी तंत्रज्ञानासाठी हे वर्ष किती महत्त्वाचे आहे, सध्या त्यावर देशात काय काम सुरू आहे, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘दै. भास्कर’चे प्रमोद त्रिवेदी यांनी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. एस. पी. कोचर यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेतील प्रमुख मुद्दे.

एक-दोन कंपन्या या वर्षी सुरू करू शकतात 5 जी

Q. 5 जी सेवा लोकांचे जीवन कसे बदलेल ?
- 4 जीचा वैयक्तिक उपयोग जास्त होता, तसे 5 जीमध्ये होणार नाही. 5 जीमध्ये लोकांना इंटरनेटचा वेग जास्त मिळेल, पण 5 जीचा जास्त उपयोग उद्योगांत होईल. 5 जीमध्ये यंत्रांचा परस्पर संवाद होईल. हे तंत्रज्ञान उद्योगात क्रांती घडवेल. रोबोटने काम होईल. स्मार्ट सिटीसारख्या योजना वेगाने पूर्ण होऊ शकतील. औद्योगिक उत्पादकता अनेक पटींनी वाढेल.

Q. 5 जी हँडसेटबाबत काय तयारी आहे?
- सध्या 5 जी हँडसेट महाग आहेत. स्वस्त, परवडणारे 5 जी स्मार्टफोन कसे येतील हेही आम्ही पाहत आहोत. ते लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. 5 जी फोनची किंमत ८ ते १० हजार राहावी, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत.

Q. २०२१ मध्ये देशात 5 जी सेवा सुरू होऊ शकेल?
-या वर्षी 5 जीची चाचणी होईल. पण व्यावसायिक स्तरावर लाँच होण्याची शक्यता कमीच दिसते. सध्या सरकारने 5 जीच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. लिलावानंतर किंमत निश्चित होईल, 5 जीसाठी नेटवर्क आणि साहित्य लागेल. त्यानंतरच 5 जी नेटवर्क सुरू होऊ शकेल. सर्व काही ठीक राहिले तर या वर्षी एक-दोन कंपन्या व्यावसायिक सुरुवातही करू शकतात.

Q. दूरसंचारमध्ये २०२१ मध्ये काय बदल होतील?
- ग्राहकांना चांगल्या सुविधा चांगल्या दरात मिळाव्यात, असा आमचा नेहमीप्रमाणेच प्रयत्न राहील. ज्या प्रकारे मार्चमध्ये स्पेक्ट्रम लिलावाची आधारभूत किंमत निश्चित झाली त्या हिशेबाने सध्या किंमत कमी होण्याची शक्यता कमी आहे. पण सरकारशी करात सूट मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. जर ती मिळाली तर किंमत कमी होईल. किंमत कमी झाल्यास डेटा आणखी स्वस्त होऊ शकतो.

Q. करात सूट मिळाली तर फायदा युजर्सना होईल की कंपन्यांना?
- कर कमी होण्याचा मोठा फायदा युजर्सनाच असेल. आवश्यक सेवा मानून कर कमी करायला हवा. त्यामुळे लोकांना योग्य किमतीत चांगले इंटरनेट मिळेल. दूरसंचारवर जे शुल्क आणि कर लावण्यात आले आहेत त्यांचे राष्ट्रीयीकरण करावे आणि ते कमी करावेत, हे आपल्याला पाहावे लागेल.

Q. तुम्हाला करात कशा प्रकारची सूट हवी आहे?
- दूरसंचारवर जवळपास ४०% पर्यंत कर आहेत. करांच्या दृष्टीने पाहिले तर दूरसंचार उद्योगाला एक आवश्यक सेवा मानले जात नाही, ते योग्य नाही. स्पेक्ट्रम शुल्क, परवाना शुल्क, यूएसओ फंडा यांसारख्या सर्व गोष्टी आमच्यावर लागू होतात. त्या कमी कराव्यात, असा आमचा आग्रह असतो.

Q. सरकार मार्चमध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. दूरसंचारला काय फायदा होऊ शकतो?
- आपल्याकडे जो लिलाव होतो, तो आधारभूत दराच्या जुन्या सूत्रानुसार होतो. त्यापेक्षा वरच बोली लावू शकता, असे सांगतात. त्यामुळेच गेल्या लिलावात बरेच स्पेक्ट्रम विकले गेले नव्हते. या आधारभूत दरावरच संपूर्ण स्पेक्ट्रम विकले जाईल का, अशी चिंता आहे.

Q. बजेटकडून काय अपेक्षा आहेत?
आम्ही सरकारला आमचे म्हणणे सांगितले आहे. आमच्यावर अनेक पद्धतींनी जीएसटी लावला जात आहे, तो हटवा. लिलाव सेवा क्षेत्रात समाविष्ट नाही, तरीही लिलावावर जीएसटी लागतो. स्पेक्ट्रमची खरेदी केल्यास जीएसटी लागतो. परवाना शुल्क आम्ही सरकारला देतो, तेव्हा त्यावर जीएसटी लागायला नको, कारण आम्ही तर सरकारला शुल्क देत आहोत, मग त्यावर सेवा कर कसा लागू शकतो?

बातम्या आणखी आहेत...