आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:आयबीएमचा सुपर काॅम्प्युटर लस शाेधताेय, सॅमसंगने पुरवले ग्लाेव्ह्जद्वारे चालणारे फोन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या कशी मदत करीत आहेत...

जगभरातील दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या काेराेना विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये अनेक पद्धतीने मदत करीत आहेत. अर्थातच ही मदत केवळ डाेनेशनच्या स्वरूपातच नाही, तर या कंपन्या आपले तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळावर या कसाेटीच्या क्षणातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘फॉर्च्यून ग्लोबल 500’ यादीतील टॉप 15 मध्ये सहभागी या 5 बड्या तंत्रज्ञान कंपन्या यूजर्स, प्रशासन आणि आराेग्य कर्मचाऱ्यांना कशी मदत करीत आहाेत, त्याचा हा तपशील...

अॅपल | ‘सीरी’ला स्मार्ट बनवले, गुगल साेबत एकत्रितपणे करीत आहे काम

> कोरोना विषाणूच्या संदर्भात काेणतीही चुकीची माहिती पसरू नये यासाठी एखाद्या आराेग्य संघटनेद्वारा किंवा सरकारद्वारे न आलेले सारे अॅप्स हटवण्यात येत आहेत. जगभरातील स्टाेअर्स बंद ठेवले आहेत आणि मानव संपर्क कमी करण्यासाठी एयरपॉड्स आणि वॉचच्या ट्रायल देखील बंद केल्या. 

> दरवर्षी कॅलिफाेर्नियात हाेणाऱ्या ‘वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस’ ला पूर्णत: आॅनलाइन केले. यामध्ये ं हजारों सॉफ्टवेयर डेवलपर्स सहभागी हाेतात.

> अॅपलनेे व्हाॅइस असिस्टंट ‘सीरी’ला अधिक स्मार्ट बनवले आहे. ‘काय, मला काेराेनाचा संसर्ग झाला आहे?’ असे विचारले तर काही प्रश्नांच्या माध्यमातून ‘सीरी’ गाइड करते. गूगलच्या मदतीने अॅपल एपल कॉन्टॅक्ट  ट्रेसिंग तंत्रावर काम करीत आहे.  जेणेकरून काेराेना बाधित व्यक्तीला याेग्य प्रकारे ट्रेस करून यूजर्सला माहिती मिळेल.

मायक्रोसॉफ्ट : डॉक्टर-नर्सच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर करण्यात आले अपडेट

> विभिन्न कंपन्या आणि सरकारांना आपल्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि क्लाउड संबंधित सेवा देत आहेत. जेणेकरून  वैज्ञानिक शोध आणि लस आदीच्या विकास कार्यात मदत मिळेल. यासाठी मायक्रोसॉफ्ट ने ‘इम्यूनिटीबायो’ कंपनी साेबत टायअप देखील केले आहे.

> मायक्रोसॉफ्ट हेल्थकेयर बॉट सर्विसच्या माध्यमातून कंपन्या, सरकारंना चॅट बाॅट सर्व्हिस देत आहेत. मार्चनंतर 1230 पेक्षाही अधिक काेविड-19 बाॅट्स बनले, 1.0 काेटी युजर्सच्या 16 काेटी मॅसेजला समर्पक उत्तरे दिली.

> डॉक्टर-नर्सच्या मदतीसाठी ‘मायक्रोसॉफ्ट 365’ सॉफ्टवेयर मध्ये नवे टूल्स जाेडले. रूग्णांची व्हर्च्युअल व्हिजीट ठरवणे, शिफ्टच्या आधारे डाॅक्टर ठरवणे इ. 

> कोरोना रुग्णांची आकडेवारी देण्यासाठी मायक्राेसाॅफ्टने काेराेना व्हायरस ट्रॅकर तयार केला आहे.

फेसबुक : फेक न्यूज आणि चुकीच्या जाहिरातींपासून बचाव करण्यास प्राधान्य

> फेसबुक अशा जाहिरातींवर बंदी आणत आहे, जे काेराेनावरील इलाजाचा दावा करीत असतात. याशिवाय डब्ल्यूएचओ व स्थानिक अधिकाऱ्यांना लाेकांशी जाेडण्याचा प्रयत्न करीत आहे. याचप्रमाणे चुकीच्या बातम्यांना स्वत: स्पॅम ठरवत आहे. 

> फेसबुकने कोविड-19 विषयी माहिती देण्यासाठी ‘कोरोना इंफॉर्मेशन सेंटर’ सुरू केले. डब्ल्यूएचओच्या सहाय्याने फेसबुक मैसेंजरवर चैट बॉट्सद्वारे माहिती दिली जात आहे.

> फेसबुक व्हाॅट्सएपचा देखील मालक आहे. यावर देखील कोविड-19 इंफॉर्मेशन सेंटर सुरू केले आहे. अनेक देशांच्या सरकारचे मदतकक्ष उपलब्ध आहे. उदा. भारतात मायगॉव सर्विसच्या 9013151515 वर संपर्क साधू शकता.   > इंस्टाग्राम वर कोविड-19 अलर्ट्स आणि #coronavirus सर्च केल्यास माहिती देणारे फिचर्स उपलब्ध हाेतात.

सॅमसंग : सॅनिटायझिंग सर्व्हिस लॉन्च केली, मास्कचे उत्पादन वाढवण्यात मदत

> यूकमध्ये सॅमसंगने 200 माेबाइल नॅशनल हेल्थ सर्व्हिसला दान केले, ज्यास ग्लाेव्ज घालून देखील चालवता येते. सामान्यत: ग्लाेव्ज वापरल्यानंतर टचस्क्रीन काम करीत नाही. 

> कंपनीने ‘गॅलेक्सी सॅनिटायझिंग सर्व्हिस’ लॉन्च केली, जी स्मार्टफोन सॅनिटाइज करू शकते. त्यासाठी रसायनांचे नव्हे तर युव्ही-सी मशिनचा वापर केला जाताे. 

> दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग आपल्या विशेषज्ञांना मास्क बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये पाठवत आहे. जेणेकरून मास्कचे उत्पादन अधिक वेगाने करता येऊ शकेल. यामुळे कंपन्यांची क्षमता प्रतीदिन 40 हजार वरून आता 1 लाखावर पाेहाेचली. कंपनीने कॅनाडा, चीन, कोलंबिया, वियतनाम आणि हॉन्गकॉन्ग मध्ये सुमारे 6.5 लाख मास्क दान केले आहेत.

गूगल : मॅप आणि यूट्यूबसारख्या सर्व  सर्व्हिसमध्ये जाेडले नवे टू्ल्स

> कोरोना वायरस बाबत चुकीची माहिती देणारे अॅप सतत प्ले स्टाेअरवरूप हटवण्यात येत आहेत. काेराेना विषाणूची माहिती देण्यासाठी अनेक नाॅलेज पॅनल तयार करण्यात आले आहेत, जे युट्यूब आणि सर्च इंजिन सारख्या विविध प्लॅटफाॅर्मवर युजर्सला जागरूक करीत आहेत. 

> गूगलची आर्टिफिशियल इंटेलीजेंस कंपनी ‘डीप माइंड’च्या काही सेवा संशाेधक आणि वैज्ञानिकांसाठी माेफत ठेवण्यात आल्या आहेत. जेणेकरून याचा वापर लस बनवण्यासाठी आवश्यक गणना करता येऊ शकेल. संशाेधकांसाठी 44 हजार लेख.

> गूगलने आपल्या निरनिराळ्या सेवांमध्ये अनेक टूल्स जाेडले आहेत. तसेच नवी वेबसाइट google.com/covid19 लॉन्च केली आहे. गूगल मॅप्सवर फूड आणि नाइट शेल्टर्सची माहिती देण्यात आली आहे. यूट्यूब वर ‘कोरोना वायरस न्यूज शेल्फ’ फीचर सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...