आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Covid 19 WhatsApp: WhatsApp New Limit On Chat Forwards To Curb Misinformation Fake News, Read All You Need To Know

अफवांवर लगाम:व्हॉट्सअपवरून आता केवळ एकाच चॅटवर फॉरवर्ड करता येणार फॉरवर्डेड मेसेज; कोविड-19 संदर्भातील अफवा रोखण्यासाठी निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 5 चॅटला फॉरवर्ड करण्याची होती मर्यादा आता एकालाच करता येणार फॉरवर्ड

कुठल्याही घटनेवर सोशल मीडियावर फॉरवर्ड केले जाणारे मेसेज सर्वात घातक ठरू शकतात. नैसर्गिक संकट असो वा दंगल किंवा महामारी अशा स्वरुपाचे मेसेज खरे आहेत की खोटे याची शहनिशा न करता सर्रास पुढे ढकलले जातात. व्हॉट्सअपवरून पसरवल्या जाणाऱ्या मेसेजचा महापूर फॉरवर्डेड मेसेज रोखण्यासाठी आता कंपनीने नवीन फीचर आणले आहे. कोरोना विरोधात वाढत्या अफवा, खोट्या बातम्या आणि द्वेष रोखण्यासाठी व्हॉट्सअपने फॉरवर्डेड मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, एखादे मेसेज खूप फॉरवर्ड होऊन तुमच्याकडे आल्यास तुम्ही ते केवळ एकाच चॅटला फॉरवर्ड करू शकाल. आता एकापेक्षा जास्त चॅट निवडून ते अनेकांना फॉरवर्ड करता येणार नाहीत. व्हॉट्सअपचे नवीन फीचर प्रामुख्याने अफवा पसरवण्यासाठी सर्वात कुप्रसिद्ध फॉरवर्डेड मेसेजेसला लक्ष्य करण्यात आले आहे. व्हॉट्सअपने सुद्धा फॉरवर्डेड मेसेजला धोका म्हटले आहे. त्यामुळे, आता फॉरवर्डेड मेसेज किंवा व्हायरल झालेले मेसेज एक व्यक्ती केवळ एकाच व्यक्तीला किंवा ग्रुपला चॅट करू शकेल. सोबतच, जास्त फॉरवर्ड केल्या जाणारे मेसेज सध्या विशेष खूण करून चिन्हित केले जातील. उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड मेसेज एकाचवेळी 5 जणांना शेअर करता येईल अशी सुविधा होती. आता ही सुविधा काढण्यात आली आहे. 5 लोकांना फॉरवर्ड करणे ही सुद्धा एक मर्यादाच होती. केवळ 5 लोकांना मेसेज फॉरवर्ड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा व्हायरल मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण 25 टक्के घटले असा कंपनीचा दावा आहे. आता ही मर्यादा केवळ एका चॅटपुरती करण्यात आल्याने निश्चितच विनाकारण चुकीचे आणि सत्यता न तपासता मेसेज पुढे ढकलण्याचे प्रमाण कमी होईल असे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...