आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजर्सला आवडत नाहीये मेटा:17 वर्षात पहिल्यांदा फेसबुकला मोठा झटका, 3 महिन्याच्या आत 5 लाख यूजर्स झाले कमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक यूजर्सला कंपनीचे नवीन नाव 'मेटा' हे पसंद आलेले दिसत नाही. मेटाद्वारे जारी तिमाही रिपोर्टनुसार, फेसबुकने 2021 च्या चौथ्या तिमाहीत गेल्या तिमाहीच्या आधारावर अर्धा मिलियन (जवळपास 5 लाख) ग्लोबल डेली यूजर्स गमावले आहेत. फेसबुकची सुरुवात 2004 मध्ये झाली होती. 2004 नंतर त्यांच्यासाठी ही पहिली वेळ आहे जेव्हा त्यांच्या डेली अॅक्टिव्ह यूजर्स (DAU) मध्ये घट झाली आहे. या दरम्यान कंपनीच्या नफ्यातही घसरण झाली आहे.

मेटाच्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी यूजर्स वाढ देखील खूप कमी राहिली. 2021 हे देखील मेटासाठी अनेक वादांनी वेढले गेले होते. गेल्या वर्षी त्यांच्या धोरणाबाबत अनेक मोठे खुलासे झाले होते. यामुळेच 17 वर्षांत प्रथमच फेसबुकचे यूजर्स आणि उत्पन्न दोन्हीमध्ये घट झाली आहे.

1.930 ते 1.929 बिलियन यूजर झाले
कंपनीची कामगिरी विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे मेटाच्या तिमाही आर्थिक निकालांनी म्हटले आहे. फेसबुकचे डेली अॅक्टिव्ह ग्लोबल यूजर्सची संख्या एका तिमाहीपूर्वी 1.930 अब्ज होती, ती आता 1.929 अब्ज झाली आहे. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारख्या इतर मेटा अॅप्समध्ये देखील खूप कमी यूजर्सची वाढ दिसून आली.

द व्हर्जच्या अहवालानुसार, उत्तर अमेरिकेतील डेली अॅक्टिव्ह यूजर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. म्हणजेच जगभरात कमी झालेल्या 5 लाख यूजर्समध्ये उत्तर अमेरिकेतील यूजर्सचा सर्वाधिक समावेश आहे. येथे मेटा जाहिरातीद्वारे सर्वाधिक कमाई करते.

अॅपल, टिकटॉक, यूट्यूबवर आरोप
अपेक्षेपेक्षा कमी कमाई झाल्याचा ठपकाही कंपनीने अॅपलवर ठेवला आहे. मेटा म्हणते की अॅपलच्या गोपनीयता धोरणातील बदलांमुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींसाठी यूजर्सना टार्गेट करणे कठीण झाले आहे. कंपनीने टिकटॉक आणि गुगलच्या यूट्यूबने देखील नुकसान झाल्याचा हवाला दिला आहे.

कंपनीचे सुमारे 200 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले
मेटा ने डिसेंबर तिमाहीत 10.3 बिलियनची कमाई केली. या कालावधीत, कंपनीची विक्री एका वर्षापूर्वी 28.1 बिलियन डॉलरने वाढून 33.67 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. मात्र प्रति शेअर कमाई पाहिल्यास, ती एका वर्षापूर्वी 3.88 डॉलरने कमी होऊन 3.67 डॉलरवर आली आहे. बुधवारी मेटाच्या व्हॅल्यूएशनने जवळपास 200 बिलियन डॉलर (सुमारे 15 लाख कोटी रुपये) चे नुकसान झाले. तासांनंतरच्या ट्रेडिंगमध्ये मेटा शेअर्स 22.9% ने घसरून 249.05 वर आला.

2021 मध्ये अनेक वादांमध्ये सापडली मेटा

1. महामारीशी संबंधित चुकीची पोस्ट व्हायरल झाली
कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कोविड-19 महामारी आणि लसीकरणाशी संबंधित अनेक बनावट प्रोफाइलची जाहिरात केली. यामुळे गेल्या वर्षी या प्रोफाइलला 370,000 फॉलोअर्स मिळाले. न्यूजगार्डने फेसबुकशी संबंधित हे संशोधन केले आहे. ही एक संस्था आहे जी इंटरनेटवर येणार्‍या खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषण, प्रक्षोभक मजकूर यावर लक्ष ठेवते. हे 20 अकाउंट, पेज आणि ग्रुपला ट्रॅक करत होते. फेसबुकने आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रमोट केलेल्या ग्रुप्समध्ये प्रयोगाच्या नावाखाली बालकांची हत्या करण्याविषयी बोलले जात होते.

2. फेसबुकच्या ट्रेड टूलने होत होती ह्यूमन ट्रॅफिकिंग
फेसबुक व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या निवेदनात नवा खुलासा करत म्हटले की, आजही तुम्ही फेसबुकवर अरबीमध्ये 'खादिमा' किंवा 'मेड्स' शोधल्यास, आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई महिलांचे वय आणि फोटो किंमतींसह दिसतील. कोणताही यूजर्स त्यांच्या आवडीनुसार त्यांना हायर करु शकतो. फेसबुकने असोसिएटेड प्रेसला सांगितले आहे की, मध्यपूर्वेतील परदेशी कामगारांच्या शोषणाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आम्ही ही समस्या गांभीर्याने घेत आहोत. आम्ही आमच्या व्यासपीठावर अनेक वर्षांपासून मानवी तस्करीच्या समस्येशी लढत आहोत.

3. भारत में ‘फेकबुक’ की शक्ल ले चुका फेसबुक
हौगेन ने एक दूसरे खुलासे में बताया है कि भारत में यह प्लेटफॉर्म ‘फेकबुक’ (फर्जी सामग्री की पुस्तक) की शक्ल लेता जा रहा है। इस समूह में ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ भी शामिल है। इसके लिए हौगेन ने इन रिपोर्टों-अध्ययनों के दस्तावेज जुटाए हैं। इनके आधार पर वे लगातार फेसबुक की कार्य-संस्कृति, अंदरूनी खामियों आदि से जुड़े खुलासे कर रही हैं। उनके द्वारा सार्वजनिक किए गए ‘फेसबुक पेपर्स’ के मुताबिक भारत में फर्जी अकाउंट्स से झूठी खबरों के जरिए चुनावों को प्रभावित किया जा रहा है।

3. फेसबुकने भारतात 'फेकबुक'चे रूप घेतले आहे
हॉगेन यांनी आणखी एका खुलाशात सांगितले आहे की, भारतात हे प्लॅटफॉर्म 'फेकबुक' (बनावट सामग्रीचे पुस्तक) चे रूप घेत आहे. न्यूयॉर्क टाइम्सचाही या गटात समावेश आहे. त्यासाठी हौगेनने या रिपोर्ट-अभ्यासाचे दस्तावेज जमा केले आहेत. याच्या आधारावर ते सलग फेसबुकची कार्य-संस्कृती, अंतर्गत त्रुटी आदींसंबंधीत खुलासे करत आहेत. त्यांच्या द्वारे सार्वजनिक केलल्या 'फेसबुक पेपर्स'नुसार भारतात बनावट अकाउंटवरुन खोट्या बातम्यांच्या माध्यमातून निवडणुकांवर प्रभाव टाकला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...