आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी बुधवारी देशाची पहिली मेड इन इंडिया क्लाऊड स्टोअरेज व फाइल शेअरिंग सेवा डिजिबॉक्स (DigiBoxx) लाँच केली. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर २० जीबीपर्यंत मोफत डेटा ठेवता येईल. आजवर गुगलसारख्या विदेशी कंपन्याच अशी सेवा देत होत्या. डिजिबॉक्सवर कुठूनही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, फोल्डर मॅनेज करता येतील. सध्या ही सेवा वेबसाइटच्या माध्यमातून वापरता येते. लवकरच अँड्रॉइड व आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवरही उपलब्ध होणार आहे.
डिजिबॉक्सची वैशिष्ट्ये
> डिजिबॉक्सवर आयडी तयार करून डेटा स्टोअर करता येईल.
> ई-मेलसोबत मोबाइल नंबरद्वारे इतरांशी शेअरही करता येऊ शकतो.
> डिजिबॉक्सची फाइल इन्स्टाशेअर माध्यमातून शेअरही करता येईल.
> २० जीबीपर्यंत क्लाऊड स्टोअरेज मोफत. कमाल २ जीबीपर्यंत फाइल अपलोड करता येऊ शकते.
> ३० रुपयांच्या मासिक सबस्क्रिप्शन वर २ टीबी स्पेस मिळेल. १० जीबीची फाइल अपलोड करता येईल. ९९९ रुपयांत २५ टीबी स्टोअरेज मिळेल.
> गुगल १५ जीबी फ्री स्टोअरेज देते. १०० जीबी क्लाऊड स्टोअरेजसाठी मासिक १३० रुपयांचे शुल्क घेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.