आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:फोर्ड भारतात ईव्ही बनवणार नाही, टेस्लाचेही इंडोनेशियाकडे पाऊल

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन कार कंपनी फोर्डने जगभरातील पुरवठ्यासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) तयार करण्याची योजना रद्द केली आहे. कंपनीच्या भारतीय व्यवस्थापनाने गुरुवारी चेन्नई प्लँटमधील कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली.

फोर्ड इंडिया युनियनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “व्यवस्थापनाने कामगारांना सांगितले आहे की भारतात ईव्ही तयार करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. चेन्नईचा प्रकल्प जूननंतर बंद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात सरकारी धोरणांमध्ये कोणतीही सवलत मिळत नसल्याचे पाहून टेस्ला कंपनीनेही इंडोनेशियाकडे मोर्चा वळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...