आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्च इंजिनमध्ये AI फीचर जोडणार गूगल:इंटरनेट सर्चमध्ये लवकरच लेटेस्ट लँग्वेज मॉडलसह थेट संवाद साधता येणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलेले गूगल लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये AI फीचर जोडणार आहे. गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंनी ही माहिती दिली आहे. चौथ्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जारी करताना ते म्हणाले की यूझल लवकरच इंटरनेट सर्चमध्ये लेटेस्ट लँग्वेज मॉडेलसह थेट संवाद साधण्यास सक्षम होतील.

सर्चदरम्यान तथ्यात्मक आणि सामान्य संवाद शैलीत रिझल्ट दाखवण्यासाठी गूगल लॅम्डा म्हणजेच लॅंग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशनचा वापर करेल. पिचाई म्हणाले की, 'आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. सर्वोत्तम अजून बाकी आहे.' गूगलची स्पर्धक मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक असलेली कंपनी ओपनएआयचा चॅटबॉट चॅटजीपीटी सध्या जगभरात चर्चेत आहे.

मोठ्या जागतिक टेक कंपन्यांचा नफा 34 टक्क्यांपर्यंत घटला

जगातील तीन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा नफा डिसेंबरच्या तिमाहीत घटला आहे. गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा नफा सर्वाधिक घटला आहे. उत्पन्न आणि नफ्यातील घट यामुळे त्रस्त टेक कंपन्यांनी खर्च कपातीला सुरुवात केली आहे.

त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ते खर्च घटवण्याच्या पद्धतींवर काम करत आहेत. भविष्यातील प्रकल्प टाळण्याचा यात समावेश आहे. याशिवाय अमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि मेटाने 10-10 हजारहून जास्त कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे.

भारतात लवकरच सुरू होणार अॅप्पलचे रिटेल स्टोअर्सः टीम कूक

अॅप्पल भारतीय बाजाराविषयी खूप उत्सुक आहे. सीईओ टीम कूक म्हणाले की जगभरातील दुसऱ्या मोठ्या मोबाईल फोन बाजारात म्हणजेच भारतात विकासाच्या खूप शक्यता आहेत. इथे लोक विक्रमी गतीने आयफोनवर स्वीच होत आहेत.

गेल्या वर्षी कंपनीचा विकास दुप्पट अंकात राहिला. कूक म्हणाले, 'आम्ही 2020 मध्ये इथे ऑनलाईन स्टोअर घेऊन आलो. आता लवकरच भारतात अॅप्पलचे रिटेल सुरू करण्याची तयारी करत आहोत.' अॅप्पलने भरतीही सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...