आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅटजीपीटीच्या आव्हानाला गूगलचे उत्तर:सर्च इंजिनसोबत एआय बॉट जोडणार, Bard AI सह गूगलवर सर्च करता येणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅटजीपीटीच्या उदयानंतर चॅटबॉटच्या निर्माण होत असलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर गूगल लवकर आपल्या सर्च इंजिनमध्ये मोठे बदल करणार आहेत. गूगल सर्च इंजिनला लवकरच आता कृत्रिम बुद्धिमत्तेचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे आता युझर्सना गूगल सर्च करताना एआय चॅटबॉटचीही मदत मिळणार आहे.

चॅटजीपीटीचा सामना करण्यासाठी प्रयत्न

चॅटजीपीटीच्या आव्हानाचा सामना करण्याच्या दृष्टीने गूगलने हे पाऊल उचलले आहे. यानुसार आता गूगलने Bard AI गूगल सर्च इंजिनसोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हा Bard AI चॅटबॉट अलिकडेच सादर करण्यात आला होता. तो आता गूगल सर्च इंजिनसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे युझर्सना गूगल सर्चदरम्यान चॅटजीपीटीसारखी उत्तरेही मिळतील.

सुंदर पिचाईंनी दिली माहिती

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अलिकडेच याविषयीची माहिती दिली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. मायक्रोसॉफ्टनेही अलिकडेच बिंज या सर्च इंजिनला चॅटजीपीटी जोडून ते सादर केले होते. त्याचप्रमाणे आता गूगलही लवकरच Bard AI सोबत नव्या स्वरुपात दिसणार आहे.

ही बातमीही वाचा...

चॅटजीपीटीची परीक्षा:आयआयटी एंट्रन्स टेस्ट जेईई अ‌ॅडव्हान्समध्ये नापास, नीटमध्ये 50% पेक्षा कमी आणि क्लॅटमध्ये फक्त 50% गुण