आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत :संकटाचा काळ लोकांना नवीन शोधासाठी तयार करेल, पुढचा मार्ग दाखवेल; आशेचे पर्व - सुंदर पिचई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारी आणि तंत्रज्ञानाची भूमिका, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांची मुलाखत

नेंसी गिब्स

जगभरातील कोविड-१९ महामारीने तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका रेखांकित केली आहे. यावेळी सरकार आणि नागरिकांनी गुगलकडेे मदद मागितली. टाइम मासिकानेे गुगल, यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे भारतीय मूलनिवासी सीईओ सुंदर पिचई यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. पिचई महामारींविषयी भविष्यातील स्थितीसाठी आशावादी आहेत. ते मानतात प्रत्येक संकट लोकांमध्ये क्रियाशीलता वाढवते. स्थितीशी सामना करण्यासाठी नवीन पद्धतींचा शोध घेतला जातो, त्यांच्याशी झालेला संवाद.


अनेक संशोधक आणि तुमचे म्हणणे आहे की संकट आल्याने संशोधन वाढते. आताच्या काळात काय स्थिती आहे ?

- डॉट कॉम कंपन्या कोसळण्याच्या ठीक आधी गुगलची सुरुवात झाली होती. त्याची उभारणी अभावांच्या स्थितीत झाली आहे. यातून आम्हाला समस्यांचे समाधान आणि अडचणींचा सामना करण्याची प्रेरणा मिळाली. मग ते डिस्टन्स लर्निंग असो वा डिलिव्हरी असो, आम्ही संकटांमधून मार्ग काढला आहे. मला वाटते की, ही वेळ लोकांसाठी क्रियाशीलतेचा विचार आणि पुढचा मार्ग काढण्यासाठी तयार करेल.


असे वाटते, ही वेळ अल्फाबेट आणि अन्य टेक कंपन्यांमध्ये सहकार्य वाढवत आहे. अन्यवेळी या कंपन्यांमध्ये स्पर्धा असते?

- जेव्हा मी दुसऱ्या कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करतो तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते की ही स्थिती आम्हा सर्वांपेक्षा खूप विराट आहे. आम्ही आधीही एकत्र काम करत आहोत. उदाहरणार्थ मुलांच्या शोषणावर आमच्यात ताळमे‌ळ आहे. त्यामुळे आम्ही कोरोना विषाणूच्या मुद्द्यावरही त्याच रस्त्यावर चाललेलो आहोत.


तुम्ही स्मार्टफोनवर काँटॅक्ट ट्रेसिंग सॉफ्टवेअरसाठी अॅपलशी भागीदारीची घोषणा केली आहे. हे कोविड-१९ने संक्रमित व्यक्तीची माहिती देईल. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात रोगराईचा प्रसार रोखणे शक्य होईल; परंतु ते प्रायव्हसीशीसुद्धा जुळलेले आहे. यामुळे काय होईल ?

- प्रायव्हसीशी संबंधित आहे तर यूजरला उपयोग करण्याआधी मंजुरी द्यावी लागेल. हे पारदर्शी आहे. लोक याचा उपयोग करणे वा न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अॅपल आणि गुगलकडे कोणतीही व्यक्तिगत माहिती वा लोकेशनचा डेटा येणार नाही.


आम्ही चुकीच्या सूचनांच्या काळात राहत आहोत. याचा बहुतेक प्रसार ऑनलाइन आहे. कोविड-१९च्या संबंधित अशी माहितीची स्पर्धा वास्तविक आणि खऱ्या बातम्यांमध्ये आहे. याच्याशी कसे लढाल?

- माझ्यासाठी विश्वसनीय संस्था आणि स्रोतांचे समर्थन करणे नेहमी महत्त्वपूर्ण राहिले आहे; परंतु आता ते सोपे आहे. कारण लोकांना माहीत आहे की खरे काय आहे. वैज्ञानिक, संबंधित अधिकाऱ्यांकडून खऱ्या माहितीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते.


गुगल, यूट्यूबसहित प्रमुख प्लॅटफाॅर्मना मजकुराच्या निरीक्षणासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेंसवर अधिक निर्भर राहावे लागते. यावेळी मानवीय अॅनालिस्ट घरून काम करत आहे. काय यामुळे चुकीचा माहिती समोर येण्यास सोपे झाले नाही?

- हा धोका तर आहे. आम्ही आधी गुगल, यूट्यूबवर आरोग्य संस्था, प्रसारण माध्यमांसारख्या अधिकृत स्रोतांच्या बातम्यांना प्राथमिकता दिली आहे. आम्ही काही वेळापर्यंत कोरोना विषाणूवर जाहिरातींना परवानगी दिली नाही. कारण आम्ही मजकुराला नियंत्रित करण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल आश्वस्त नव्हताे. पण आता आम्ही घरून चांगल्या प्रकारे काम करण्याच्या प्रक्रियेला सुरू केले आहे, यासाठी आता आम्ही लोकांचा आवाज एेकू शकतो. तुम्हाला लोकांना बोलण्याची संधी द्यावी लागेल.


या महामारीने स्थानिक बातम्या देणाऱ्या माध्यमांना प्रभावित केले आहे. त्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल ?

- आम्ही त्यांच्यासाठी काही कार्यक्रमांवर काम करत आहे. तसे पाहिले तर, स्थानिक स्तरावर स्वस्थ आणि निष्पक्ष पत्रकारितेला आधार देण्याची आवश्यकता आहे.


हे संकट आमच्या काम करण्याच्या पद्धतींना किती बदलेल? खूप लोक दूर बसून काम करतील काय?

- घरातून चांगल्या प्रकारे काम करणे यामुळे संभव झाले. कारण आम्ही आधी समोरासमोर काम केले आहे. आम्ही पाया घडवला आहे. आम्हाला हा पाया पुढेसुद्धा तयार करण्याची आवश्यकता पडेल. हा मानवी स्वभावाचा हिस्सा आहे. आम्ही गोष्टींना अधिक लवचीक करू शकू. लोकांना येण्याजाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा कुटुंबावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. आम्हाला याचा चांगले समाधान शोधावे लागेल.


प्रत्येकाजवळ घरात टेक्नाॅलॉजी आणि इंटरनेट नाही. यामुळे काही कामगार आणि विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. आपण हे अंतर कसे दूर करू?

- या संबंधात अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. अमेरिकेसाठी पाहिले तर आम्हाला ग्रामीण भाग आणि गरिबांपर्यंत इंटरनेट आणि दूरसंचार सेवा पुरवणे गरजेचे आहे.


हा गंभीर विषय नाही का की व्यावसायिक जगात अशा भूमिका निभावण्यासाठी म्हटले जात आहे जे गत सरकारांच्या अधिकारात होते ?

- कोविड-१९चा सामना करण्यासाठी टेक्नाॅलॉजी आणि टेक कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकेल. आम्ही हे पण काम करण्यासाठी इच्छुक आहोत. मी याला मोठी गोष्ट मानत नाही. सगळ्यांच्या भूमिका एकदम स्पष्ट आहे. संकटात नेतृत्व करण्याची जबाबदारी सरकार आणि सरकारी आरोग्य संघटनांची आहे.


गैलप-नाइटच्या ताज्या सर्व्हेनुसार ७७% अमेरिकी विश्वास करतात की अल्फाबेटसारख्या टेक कंपन्या खूप अधिक ताकदवान झाल्या आहेत, तुम्ही याचा कसा विचार करतात?

- मागील काही वर्षांमध्ये मोठ्या कंपन्यांची खूप जास्त प्रगती झाली आहे. त्यामुळे, ही वेळ तपासून घेण्याची आहे. माझा असा विचार आहे की, एका कंपनीच्या रूपात आम्हाला निश्चित करावे लागेल की आम्ही समाजासाठी काय चांगले करत आहे. काय आम्ही कंपन्यांची, शाळांची आणि विश्व आरोग्य संघटनांसारख्या संस्थांना सहकार्य करतो. आम्हाला या परीक्षेतून अनेेक वेळा जावे लागेल.


कोविड-१९ मुळे शारीरिक हानीचा धोका आहे. मानसिक आरोग्याचेही संकट आहे का? खासकरून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे का?

- जेव्हा मी बैठक घेतो वा मला कर्मचाऱ्यांचे ई-मेल मिळतात तेव्हा पाहतो की लोक अलग-अलग आणि एकटे पडलेले आहे. तेे कुटुंबातील काही सदस्यांचे प्रभावित होणे आणि त्यांना भेटता न आल्याने चिंताग्रस्त आहे. आम्ही म्हणतो की विषाणूने सर्व मानवतेला प्रभावित केले आहे पण आकडे सांगतात की त्याने काही लोकांवर अधिक प्रभाव टाकला आहे. खासकरून अमेरिकेतील अाफ्रिकींवर. याच्याशी मानसिक आरोग्याचा विषय तर जुळलेला आहे. आम्हाला यावर लक्ष द्यावे लागणार आहे.


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली हाेती की गुगल लोकांना टेस्टिंग साइट माहीत करून घेण्याच्या मदतीसाठी सिस्टिम तयार करत आहे. मग बातमी आली की गुगलला अशा काही योजनांची माहिती नाही, काय झाले होते?

- आम्ही कोविड-१९च्या संबंधात स्क्रीनिंग, टेस्टिंगसहित भरपूर माहिती देत आहोत. यासाठी त्याला चांगल्या प्रकारे जोडण्यासाठीच्या संधी साधत आहोत.


संकटाच्या याकाळात आशादायक चित्र काय असेल ?

- आमच्याकडे सर्वात शक्तिशाली संसाधन सामूहिक कार्यवाही आहे. ते खरोखर काम करत आहे. मला पुढच्या पिढीसाठी आशादायक वाटते.

(टाइम आणि टाइम लोगो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. याचा उपयोग करारानुसार केला आहे.)

0