आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगल I/O 2023 इव्हेंट 10 मेपासून:पिक्सल 7A सह पिक्सल फोल्डही लॉन्च होणार! अँड्रॉइड 14 चे फीचर्स रिव्हिल होतील?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेक जायंट गूगलचा सर्वात मोठा इव्हेंट 'Google I/O 2023' येत्या 10 मे पासून सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये गूगल आपल्या पिक्सल आणि नेस्ट ब्रँडचे नवे डिव्हाईस लॉन्च करेल.

यासोबतच अँड्रॉईड 14 चे फीचर्स आणि एआय चॅटबॉट बार्डविषयीही गूगल या इव्हेंटमध्ये माहिती देण्याची शक्यता आहे.

गूगल पिक्सल 7A स्मार्टफोन

2022 मधील इव्हेंटमध्ये गूगलने पिक्सल 6A लॉन्च केला होता. मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी गूगल पिक्सल 7A लॉन्च करू शकते. गूगल इंडियाने ट्विट करून पुढच्या पिक्सल स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेटची माहिती दिली आहे.

तथापि, कंपनीने 11 मे रोजी लॉन्च होणाऱ्या हँडसेटच्या नावाचा खुलासा केलेला नाही. गूगलने ट्विट करत लिहिले आहे की, 'न ओरडता उत्साह कसा दाखवावा, एका मित्रासाठी विचारत आहे... 11 मे रोजी फ्लिपकार्टवर येत आहे.' यासोबतच कंपनीने स्मार्टफोन टीझही केला आहे.

अपेक्षित किंमत व फीचर्स

मीडिया रिपोर्टनुसार गूगल पिक्सल 7A मध्ये कंपनी 6.1 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देऊ शकते. यात 90Hz चा रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. गूगल पिक्सल 7A ची अंदाजित किंमत 45,990 रुपये आहे.

गूगल पिक्सल फोल्ड

कंपनी I/O इव्हेंटमध्ये गूगल पिक्सल फोल्डही लॉन्च करू शकते. अपकमिंग पिक्सल फोल्डच्या डिझाइनशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तथापि, कंपनीने अधिकृतरित्या पिक्सल फोल्डविषयी कसलिही माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, गूगल पिक्सल फोल्डमध्ये कंपनी 7.6 इंचाचा मेन डिस्प्ले आणि 6.2 इंचाचा कव्हर डिस्प्ले देऊ शकते. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल प्लस 10 मेगापिक्सल प्लस 10 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. गूगलचा हा प्रीमियम स्मार्टफोन 1.45 लाख रुपयांत लॉन्च होऊ शकतो.

गूगल पिक्सल टॅब्लेट

गूगलने ऑक्टोबर 2022 मध्ये प्रथम पिक्सल टॅब्लेटविषयी सांगितले होते. मीडिया रिपोर्टनुसार, इव्हेंटमध्ये गूगल हा टॅब्लेट गूगल टेन्सर जी2 प्रोसेससह लॉन्च करू शकते. या टॅब्लेटमध्ये 10.95 इंचांची स्क्रिन, 8 मेगापिक्सल फ्रंट आणि रिअर कॅमेरा मिळू शकतो.

गूगल पिक्सल टॅब्लेटची अपेक्षित किंमत 54,000-58,000 रुपये आहे.

अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टिम

गूगलने आधीच अँड्रॉइड 14 चा डेव्हलपर प्रीव्हू रोल आऊट केला आहे. ऑक्टोबरपर्यंत हा सर्वांसाठी रोलआऊट केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार I/O 2023 इव्हेंटमध्ये कंपनी अँड्रॉइड 14 च्या फीचर्सबद्दल माहिती देऊ शकते.

गूगल एआय फीचर्स

गूगलने I/O 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे की, जनरेटिव्ह एआयमध्ये नवे काय आहे. यात शक्यता वर्तवली जात आहे की, कंपनी या इव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स लॉन्च करू शकते. यासोबतच एआय चॅटबॉट बार्डविषयी नवी माहिती दिली जाऊ शकते.

मीडिया रिपोर्टनुसार गूगल या इव्हेंटमध्ये 20 पेक्षा जास्त नवे प्रॉडक्ट लॉन्च करू शकते.