आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गूगल मॅप्समध्ये आले नवीन फीचर:सार्वजनिक ठिकाणांवरील कोरोना संक्रमितांची लाइव्ह डिटेल मिळेल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वॉइस कमांडद्वारे कॉल रिसीव-रिजेक्ट करता येतील

कोविड-19 पासून वाचण्यासाठी आणि त्यासंबंधी अपडेट मिळवण्यासाठी गूगलने आपल्या गूगल मॅप्समध्ये नवीन फीचर्स आणले आहे. कंपनीने मॅप्समध्ये गूगल असिस्टेंट ड्राइविंग मोड हे नवीन फीचर आणले आहे. या मोडमधून अँड्रॉयड आणि आयओएस यूजर्सला रियल टाइममध्ये कोविडशी संबंधित अचूक माहिती मिळेल.

या नवीन फीचरनुसार, जर तुम्ही घराबाहेर निघालात आणि तुम्हाला पब्लिक प्लेसला जायचे असेल किंवा पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणच्या कोविड संक्रमितांची माहिती आधी मिळेल. सध्या देशात कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. पण, दिल्ली आणि केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी देशात एकूण 38 हजार 478 नवीन रुग्ण समोर आले, तर 44 हजार 671 रुग्ण ठीक झाले.

भारतीय यूजर्सला होऊल फायदा

गूगल मॅप्सवर हे फीचर अशावेळी आले आहे, जेव्हा भारतात परत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्ली सरकार गर्दीच्या ठिकाणी परत लॉकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. गूगल मॅप्स यूजरला गर्दीच्या ठिकाणांची रिअल टाइम इन्फॉर्मेशन देईल. तर, मागच्या 7 दिवसातील कोरोना रुग्णांची संपूर्ण माहितीदेखील देईल.

गूगलने सांगितले की, या नवीन फीचरच्या मदतीने लोकल अथॉरिटीची गाइडलाइंस, टेस्टिंग साइट आणि लिंकची माहितीदेखील दिली जाईल. एखाद्या स्पेसिफिक एरियाच्या ऑल टाइम डिटेक्ट केसची माहिती ऑफिशियल सोर्सकडून मिळेल. यूजर्स डिलीव्हरी ऑर्डरचे लाइव्ह स्टेटसदेखील पाहू शकतील. हे फीचर तुम्हाला संभावित ऑर्डरचा डिलीव्हरी टाइम, पिकअप टाइम याबाबत माहिती देईल. कंपनीने या फीचरला अँड्रायड आणि आयओएस यूजरसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेत लागू केले आहे.

अमेरिकेत गूगल असिस्टेंट ड्राइविंग मोडला अँड्रायड यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. या फीचरद्वारे आता ड्रायविंग करताना ड्रायवरला फोनची स्क्रीन पाहावी लागणार नाही. म्हणजेच, ड्रायव्हर वॉइस कमांडे कॉल रिसीव किंवा रिजेक्ट करता येईल. या मोडद्वारे युजरला मेसेजदेखील पाठवता येईल.

बातम्या आणखी आहेत...