आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्नॉलॉजी:4 नव्या फीचर्ससह गुगल मीट सर्वांसाठी आता मोफत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, गुगल मीटचे 4 नवीन फीचर्स

गुगलने काही दिवसांपूर्वी आपली व्हिडिओ कॉन्फरन्स सर्व्हिस मीटमध्ये जी-मेल सपोर्ट अॅड करण्याशिवाय आणखी चार नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. गुगलने सर्व युजर्ससाठी हे ६० मिनिटांच्या मिटिंग्जसाठी मोफत करण्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या ४ नवीन फीचर्स.

1. गुगल मीट आता टाइल्ड व्हिडिओ व्ह्यूपासून वेब युजर्सला व्हिडिओ चॅटमध्ये सहभागी होणाऱ्या १६ जणांना एकाचवेळी पाहण्याची सुविधा देत आहे. यापूर्वी टाइल्ड ले आउटमध्ये तुम्ही के‌वळ ४ जणांना सोबत पाहू शकत होतात. गुगलनुसार, आता मोठ्या मिटिंग्ज, प्रेझेंटेशनसाठी देखील लवकरच अपडेट्स येतील.

2. मीटमध्ये नवीन लो लाइट मोड आणलेला आहे. आता एआयच्या मदतीने तुम्ही व्हिडिओमध्ये कमी प्रकाशात देखील इतरांना स्पष्टपणे दिसाल. हे फीचर सध्या मोबाइल साठी उपलब्ध आहे.तर गुगलनुसार, लवकरच हे वेब युजर्ससाठी देखील लाँच करण्यात येणार आहे.

3. गुगलने ‘प्रेझेंट अ क्रोम टॅब’ फीचर देखील आणले आहे. यामुळे तुम्ही पूर्ण स्क्रीन शेअर न करता, केवळ एक क्रोम टॅबही शेअर करु शकतात. तसेच आवाजासह चांगल्या दर्जाचे व्हिडिओ कंटेट प्रेझेंट करण्याची संधी मिळेल. तुम्हाला हे मिटिंग्समध्ये शेअर करायचे असेल तर तुम्ही या नवीन पर्यायाचा वापर करु शकतात.

4. गुगल मीटचे युजर्स याच्या इंटेलिजेंट बॅकग्राउंड नॉइस फिल्टरिंग फीचरचा वापर करु शकतात. या फीचरच्या मदतीने बॅगग्राऊंडला येणारा नको असणारा आवाज तुम्ही बंद करु शकतात. ही सुविधा वेब युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच मोबाइल युजर्ससाठी देखील उपलब्ध होईल.