आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी थांबवण्यासाठी सोमवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान, केंद्र सरकारने हायकोर्टात म्हटले की, नवीन प्रायव्हसी पॉलिसीच्या बाबतीत व्हॉट्सअॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. हा एक गंभीर चिंतेचा विषय आहे.
या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आरोप केला आहे की, युरोपातील युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सअॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असल्याने सरकार याकडे पूर्ण लक्ष देत आहे. फेसबुकच्या मालकीचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या नवीन गोपनीयता धोरणाविरूद्ध एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की भारतीय वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकसह अन्य कंपन्यांसोबत शेअर केला जाणार आहे. परंतु ही पॉलिसी नाकारण्याचा पर्याय दिलेला नाही.
सरकारने व्हॉट्सअॅपकडे मागितली माहिती
एका वकीलाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणलात न आणण्याची मागणी केली होती. चेतन शर्मा यांनी म्हटले की, सरकार आधीपासूनच या प्रकरणात लक्ष्य देत असून, व्हॉट्सअॅपकडून याबाबत माहिती मागवली आहे. व्हॉट्सअॅफकडून कोर्टात आलेले जेष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, कंपनीला सरकारचे पत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच याबाबत माहिती देऊ. आता या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चला होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.