आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूजर सेफ्टी:कोविड-19 ऑनलाइन स्कॅमपासून बचावासाठी गुगलच्या काही सेफ्टी टीप्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कशा प्रकारे होताहेत कोविड-19 स्कॅम्स

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, मार्च ते एप्रिल या चार आठवड्यांमध्ये देशात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात ८६% वाढ झाली आहे. कोरोनाच्या वातावरणाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार जगभरातील हजारो लोकांची शिकार करीत आहेत. ते बनावट कोविड -१९ ट्रॅकर डॅशबोर्ड वरून कॉम्प्युटर हॅक करत आहेत. बनावट वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स आणत आहेत, स्वत: ला डब्ल्यूएचओचे अधिकृत सांगून फिशिंग हल्ले करत आहेत. तसेच मोफत मोबाइल डेटाचे खोटे आवाहन देत रॅनसम मेल पाठवत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुगलच्या सेफ्टी सेंटरने युजर्सच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी काही सल्ले दिले आहेत.

विश्वासार्ह माध्यम तपासा : स्कॅमर्स सहसा विश्वसनीय आणि अधिकृत स्रोतांसारखे दाख‌ण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात घेऊन वापरकर्त्यांनी कोविड -१९ ची माहिती केवळ आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासारख्या थेट स्रोतांच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवून फसवणूक टाळली पाहिजे.

माहिती सांगण्यापूर्वी बाळगा सावधगिरी

: जर आपल्याला विनाकारण वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर सावधगिरी बाळगा. संदेश तपासण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे जाणून घ्या की घोटाळेबाज तुम्हाला लॉगिन माहिती, बँक माहिती अशी गोपनीय विचारत नाही ना?

देणगी देताना दक्षता

: फसवणूक करणारे दयाळूपणाचा फायदा घेऊ शकतात आणि कोविड -१९ रिलीफ फंडाच्या नावावर देणगी देण्याची विनंती करतात. यासाठी बऱ्याच वेळा ते स्वयंसेवी संस्थांचे चुकीचे स्वरूप घेऊन आपल्याकडे पैसे हस्तांतरित करण्यास सांगू शकतात. जर आपल्याला देणगी द्यायची असेल तर कोणत्याही लिंकवर न जाता संस्थेच्या वेबसाइटवर देणगी द्या.

क्लिक करण्यापूर्वी लिंक्स आणि ईमेल अॅड्रेस तपासा

: बनावट लिंक खऱ्या लिंकप्रमाणेच असतात. तुम्हाला संदेश किंवा मेलमध्ये ‘येथे क्लिक करा’ असा पर्याय मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. चुकीचे शब्दलेखन किंवा अंक ही फसवणूक असल्याचे दर्शवतात.

वेबवर रिपोर्टसाठी सर्च करा

: जर तुम्हाला फसवणुकीचा संदेश किंवा ईमेल प्राप्त झाला असेल तर आपण मजकूर किंवा या संदेशाचा सर्वात संशयास्पद भाग सर्च इंजिनमध्ये कॉपी आणि पेस्ट करा. इतर लोकांद्वारे हे रिपोर्ट केले गेले आहे का ते पाहा.

कशा प्रकारे होताहेत कोविड-१९ स्कॅम्स

- कोरोना औषधांवर मोठ्या प्रमाणात सूट, हँड सॅनिटायझर्स किंवा फेस मास्क किंवा थर्ड पार्टीद्वारे ऑनलाइन मनोरंजन सेवांसाठी सबस्क्रिप्शनसारख्या फेक ऑफर देऊन.

- कोविड -१९ ची माहिती देणाऱ्या आयसीएमआर किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यासारख्या सरकारी संस्था असल्याचा खोटा दावा करून.

- रुग्णालये, एनजीओच्या नावाने मदत निधी मागितली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...