आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीचर्ड आर्टिकल:HONOR MagicBook 15- आकर्षक लुक्स, पॉवरफुल परफॉर्मंस आणि 3 ब्रेकथ्रू इनोव्हेशेन्ससह! जाणून घ्या काय आहे खास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

HONOR MagicBook 15 लॅपटॉप भारात लाँच झाले आहे. स्टायलिश डिझाइन, पॉवरफुल परफॉर्मंस आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीसह हे युवकांची पसंत ठरत आहे. लॅपटॉप सेगमेंटमध्ये हे HONOR चे पहिलेच व्हॅरिएंट आहे, जे यंग प्रोफेशनल आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. हे कॉम्पॅक्ट लॅपटॉप मल्टिटास्किंग आणि इनोव्हेशनसह नेहमीच लेटेस्ट टेक्नोलॉजीला पसंती देणाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे. विशेष म्हणजे, HONOR चे HONOR MagicBook 15 इंडियाचे हा पहिले लॅपटॉप आहे ज्यात 3 ब्रेकथ्रू टेक्नोलॉजीसह 50 हजार रुपयांत लाँच करण्यात आले आहे. याचे पहिले इनोव्हेशन पॉप अप वेबकॅम, दूसरे 2-in-1 फिंगर पॉवर बटण आणि तिसरे म्हणजे 65W टाइप सी कॉम्पॅक्ट मल्टी डिव्हाइस चार्जिंग असे आहे. तर जाणून घेऊया HONOR MagicBook 15 सोबत सर्वच फीचर्स...

अल्ट्रा थिन आणि लाइट लॅपटॉप

HONOR MagicBook 15 मध्ये पोर्टेबिलिटी आणि परफॉर्मंसवर भर देण्यात आला आहे. हे एक अल्ट्रा थिन लॅपटॉप आहे आणि याची थिकनेस केवळ 16.9 मिमी आहे. अतिशय लाइट वेट असलेले हे लॅपटॉप फक्त 1.53 किलोग्रॅम इतके आहे. अर्थात आपण हे कुठल्याही बॅगमध्ये ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकता. याचे चार्जर सुद्धा लाइटवेट आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, या चार्जरने तुम्ही आपले HONOR चे स्मार्टफोन किंवा इतर कुठलेही स्मार्टफोन चार्ज करू शकता.

लगेच चार्जिंग, 30 मिनिटांत 53 टक्के चार्ज

लॅपटॉप चार्ज करणे खूप वेळखाऊ ठरू शकते. अशात आपला वेळ वाया जातो. HONOR MagicBook 15 मध्ये ही समस्या दूर करण्यासाठी 65W फास्ट चार्जिंग (टाइप-सी) ची सुविधा देण्यात आली आहे. HONOR चा दावा आहे, की 65W फास्ट चार्जर केवळ अर्ध्या तासात लॅपटॉपला 53 टक्के चार्ज करू शकतो. एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यास यातून 6.3 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, 6.6 तासांचा ऑफिस यूज किंवा 6.2 तासांची वेब ब्राउझिंग मिळू शकते.

पॉप-अप कॅमरा : प्रायव्हसीची खास काळजी

आपण पॉपअप स्मार्टफोन कॅमेरा नक्कीच पाहिला असेल किंवा त्याबद्दल ऐकले असेल. प्राइव्हसीच्या बाबतीत पॉप अप टेक्नोलॉजी खास काळजी घेणारी आहे. सर्वांच्या प्रायव्हसीची काळजी घेऊन HONOR MagicBook 15 मध्ये आपल्याला पॉप अप कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा कीबोर्डमध्ये राहील. गरज पडल्यास कीबोर्डमधून हा कॅमेरा बाहेर येणार आहे. अर्थात जेव्हा आपण कॅमेरा ऑन करण्याची परवानगी द्याल तेव्हाच हा कॅमेरा सुरू होईल. अन्यथा तो कीबोर्डमध्येच दडलेला राहील.

फिंगरप्रिंट पॉवर बटणने करा पासवर्ड फ्री लॉग-इन

HONOR MagicBook 15 मध्ये आपल्याला 2-in-1 फिंगरप्रिंट पॉवर बटण मिळत आहे. यातून आपल्या मर्जीशिवाय दुसरे कुणीही लॅपटॉप सुरू करू शकणार नाही. हे बटण सुरक्षा आणि स्टाइलला लक्षात ठेवून देण्यात आले आहे. हे फीचर यूजरला खूप आवडेल. यातून आपल्याला पासवर्ड फ्री लॉग इन करता येणार आहे. अर्थातच जे लोक वारंवार आपला पासवर्ड विसरून जातात त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

फुल व्यू डिस्प्ले: मोठे स्क्रीन-टु-बॉडी रेश्यो

या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 39.6cm (15.6”) फुल व्यू डिस्प्ले आणि 1920x1080 IPS FHD डिस्प्ले, 16:9 एस्पेक्ट रेश्योसह मिळणार आहे. 5.3mm च्या अल्ट्रा थिन बेझेल्स लॅपटॉपच्या वरच्या आणि दोन्ही साइडला मिळतात. यामुळे स्क्रीन-टु-बॉडी रेश्यो 87% इतके मिळत आहे. स्टँडर्ड लॅपटॉपच्या तुलनेत आणखी एक खासियत म्हणजे, HONOR MagicBook 15 मध्ये 178 डिग्री पर्यंत व्युइंग अँगल आहे. सोबतच याचे अँटी ग्लेअर स्क्रीन कुठल्याही रिफ्लेक्शनपासून संरक्षण देते. HONOR MagicBook 15 मध्ये आय कम्फर्ट मोड आणि जे हार्मफुल लाइट्सपासून आपल्या डोळ्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. हे खास तंत्रज्ञान TUV Rheinland Certified आहे.

अलुमीनियम बॉडीसह स्टायलिश आणि प्रीमियम डिझाइन

HONOR MagicBook 15 मध्ये अलुमीनियम बॉडी आणि Azure Blue Chamfer देण्यात आले आहे. हे अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. डेकोरेटिव्ह बेलेल्ड एज आणि शानदार ब्लू शीन याला आणखी आकर्षक बनवतात. त्यामुळे, याचा लुक अगदी इनोव्हेटिव्ह, स्टायलिश आणि प्रीमिअम आहे. एकूणच हे लॅपटॉप या अतिशय प्रीमिअम आणि स्टायलिश लुक्स देणाऱ्या लॅपटॉपवरून आपल्याला शोऑफ केल्याशिवाय राहणार नाही.

परफॉर्मंसमध्ये पॉवरफुल

HONOR MagicBook 15 मध्ये AMD Ryzen 5 3500U प्रोसेसरसह Radeon Vega 8 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. त्यामुळे, हे लॅपटॉप पावरफुल परफॉर्मंसचा अनुभव देते. यामध्ये 8GB DDR4 Dual-Channel RAM आणि 256GB PCIe NVMe SSD चे ROM असल्याने सुपर फास्ट स्पीड मिळते. HONOR चा दावा आहे की PCIe लेटेस्ट जनरेशनचे तंत्रज्ञान आहे. SATA SSDs च्या तुलनेत हे अधिक स्पीड देतात. पोर्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 1 HDMI, 1 Type-C, 1 USB 3.0 आणि 1 3.5mm हेडफोन जॅक आहे.

HONOR MagicBook 15 च्या लाँचबद्दल आणखी माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/3k9Iac2

Note: All trademarks, brand names are the property of their respective owners. T&C apply. Follow us on our official website www.hihonor.com/in and social media handles (Facebook, Twitter, Instagram and YouTube) for more information on brand, products, offers and contest details, etc.