आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफाेन-14 मध्ये सॅटेलाइट फिचर:थेट उपग्रहाशी संपर्क साधणार, नेटवर्क नसलेल्या भागात अडकल्यावर उपयाेगी

न्यूयाॅर्क15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलने आयफाेन-१४ मध्ये सॅटेलाइट फीचर देणार असल्याचे जाहीर केले. माेबाइल नेटवर्क किंवा वायफाय कनेक्टिव्हिटी नसल्यावर या फीचरमुळे तुमचा फाेन थेट उपग्रहाशी जाेडला जाईल. त्याचा वापर आणीबाणीच्या स्थितीत संपर्कात राहण्यासाठी केला जाऊ शकताे. माेबाइल नेटवर्क तसेच वायफाय कनेक्टिव्हिटी असताना हे फीचर उपलब्ध नसेल. एखादे जंगल किंवा दुर्घटना झालेल्या भागात अडकल्यावर फीचरने युजर्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा वापर करून एका मेन्यूद्वारे मदत मागितली जाऊ शकते.

वास्तविक सॅटेलाइन फाेनचे तंत्रज्ञान जगासाठी नवे नाही. इमरसॅट व ग्लाेबलस्टारसारख्या कंपन्यांनी यापूर्वी सॅटेलाइट तंत्रज्ञानावर आधारित फाेनचे उत्पादन केलेले आहे. हे फाेन दिसायला जाड व माेठे असतात. त्यात एक अँटिनादेखील असताे. हे माेबाइल टाॅवरएेवजी उपग्रहाला जाेडलेले जातात. अशा फाेनमुळे पृथ्वीच्या काेणत्याही भागातून नेटवर्क रिसिव्ह करता येऊ शकते. या फाेनमधील तंत्रज्ञान महागडे असते. त्यासाठी काॅलिंग व इंटरनेट वापरही महागडा असताे. आयफाेन-१४ चे सॅटेलाइट फीचरदेखील या तंत्रज्ञानावर काम करेल. परंतु त्याचा उपयाेग केवळ आणीबाणीतील संदेश किंवा काॅलिंगसाठी केला जाऊ शकताे. म्हणजेच सामान्य काॅलिंग व इंटरनेटची सुविधा साधारण नेटवर्क तंत्रज्ञानाच्या साह्याने उपलब्ध हाेईल.

प्रयाेग यशस्वी झाल्यास भारतासह जगभरात येणार

आयफाेन-१४ चे नवे सॅटेलाइट फीचर सुरुवातीला केवळ अमेरिका, कॅनडात उपलब्ध हाेईल. दाेन वर्षे त्याची सेवा माेफत मिळेल. प्रयाेग यशस्वी झाल्यास अ‌ॅपल त्याला भारतासह इतर देशांतही उपलब्ध करून देईल. त्यासाठी विविध देशांतील सॅटेलाइट कंपन्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...