आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायरिंग ट्रेंड:येत्या 5 वर्षांत 60% नोकरदारांना शिकावी लागतील नवी कौशल्ये, 40% ना कौशल्यात सुधारणांची गरज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे पारंपरिक नोकऱ्यांच्या संधी कमी होत आहेत. तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षात भारतात फक्त आयटी क्षेत्रानेच ४.५ लाख नवीन नोकऱ्या दिल्या. या नोकऱ्यांसाठी पदवीसह अतिरिक्त कौशल्ये असणाऱ्यांना प्राधन्य मिळाले. आता कंपन्यांची पदवीसह अतिरिक्त कौशल्ये असलेल्या उमेदवारांना पसंती आहे. मॉन्स्टर डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार पुढील पाच वर्षांत नोकरीयोग्य बनण्यासाठी ४० टक्के भारतीयांना कौशल्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. ६० टक्के नोकरदारांना अतिरिक्त कौशल्ये शिकावी लागतील. त्यामुळे अपस्किलिंग आणि रिस्किलिंग म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. ज्यावेळी एखादा कर्मचाऱ्याने आपल्या विद्यमान नोकरीशी संबंधित नवीन कौशल्ये शिकून घेतली तर त्याला अपस्किलिंग म्हणतात. जर एखादी कंपनी तंत्रज्ञान अथवा अन्य एखाद्या कारणामुळे कार्यशैलीत बदल करत असेल आणि आपल्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार नवीन कौशल्ये शिकवत असले तर त्याला रिस्किलिंग म्हटले जाते.

डिजिटल मार्केटिंगची मागणी सर्वाधिक
मॉन्स्टर डॉट कॉमच्या अहवालानुसार, आगामी वर्षांमध्ये बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस अँड इन्शुरनस (बीएफएसआय), आय़टी, रिटेल, हेल्थकेअर आणि प्रॉडक्शन अंड मॅन्युफॅक्चरिंग या आघाडीच्या पाच क्षेत्रांत नोकऱ्यांसाठी अपस्किलिंग आणि रिस्किलिंगची गरज असेल. सद्यपरिस्थितीत एसईओ आणि डिजिटल मार्केटिंग कौशल्यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यानंतर डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, एआय/एमएल, सायबर सुरक्षा आणि ब्लॉकचेनच्या कौशल्यांना अधिक मागणी आहे.

सर्व क्षेत्रांसाठी वेगवेगळे आहेत अपस्किलिंगशी संबंधित कोर्स
या उदाहरणाद्वारे समजून घ्या अपस्किलिंग : असे समजा की तुम्ही शिक्षक आहात. त्यामुले ऑनलाइन शिक्षणाशी संबंधित सर्व टूल्स तुम्हाला शिकावे लागतील, जेणेकरून गरज भासल्यास विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाइन शिकवू शकाल. उदाहरण म्हणून पाहायचे झाल्यास, व्हिडिओ क्लासची रेकॉर्डिंग कशी करायची, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टिपणे कशी तयार करायची आदी. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्रांत आहात तर पेन मॅनेजमेंट, वुंड असेसमेंट, ड्रग्स मॅनेजमेंट सारखे कोर्स तुमच्या प्रगतीसाठी साह्यकारी ठरू शकतात.

रिस्किलिंगसाठी बहुतांश कंपन्या स्वत:च देतात प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांचे रिस्किलिंग करण्यासाठी कंपन्या स्वत:च प्रशिक्षणाचे आयोजन करतात. त्यामुळे कंपन्यांना नवीन उमेदवारांची भरती करावी लागत नाही. तथापि, अनेक कंपन्या जुने कर्मचारी काढून नवीन कर्मचाऱ्यांची भरती करतात. त्यामुळे आपल्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये स्वत:च शिकून घेतली तर नोकरी सुरक्षित राहील. तुमच्या कामाशी संबंधित नवीन कोर्स अ‍ॅडटेक प्लॅटफॉर्म, आयआयटी, आयआयएमसारख्या विविध संस्थामधून पूर्ण करू शकता.

बातम्या आणखी आहेत...