आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोशल मेसेजिंग अॅपप व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन सुरू असलेल्या बादात आता केंद्र सरकारने उडी घेतली आहे. सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी देत प्रायव्हसी पॉलिसीत केलेला बदल परत घेण्यास सांगितले. सरकारचे म्हणने आहे की, कोणत्याही प्रकारचा एकतर्फी बदल स्विकार केला जाणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या CEO ला लिहीले पत्र
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलसीबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपचे CEO विल कॅथकार्ट यांना कडक शब्दात पत्र लिहीले आहे. पत्रात मंत्रालयाने म्हटले की, जगाच्या तुलनेत व्हॉट्सअॅपचे भारतात सर्वाधिक युझर्स आहेत. भारत ही व्हॉट्सअॅपसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअॅपच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणात प्रस्तावित केलेल्या बदलामुळे भारतीय नागरिकांच्या निवडी आणि स्वायत्ततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा
मंत्रालयाने म्हटले की, व्हॉट्सअॅपने आपल्या बदलांना परत घ्यावे. यासोबतच इंफॉर्मेशन प्रायव्हसी, फ्रीडम ऑफ चॉइस आणि डाटा सिक्योरिटीबाबत आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा. मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारतीय युझर्सचा योग्य सन्मान व्हायला हवा. व्हॉट्सअॅपच्या सेवा अटी आणि धोरणात एकतर्फी बदल योग्य नाही आणि तो स्वीकारला जाणार नाही.
व्हॉट्सअॅपचे नवीन धोरण काय आहे?
व्हॉट्सअॅप यूझर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसीव करतात, कंपनी त्याचा वापर कुठेही करू शकणार. कंपनी त्या डाटाला कुठेही शेअर करू शकेल. ही पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार होती. पण, वाद वाढल्यानंतर डेडलाइनला वाढवून 15 मे करण्यात आले. आधी दावा करण्यात आला होता की, युझरने या पॉलिसीला अॅग्री न केल्यास व्हॉट्सअॅप बंद होणार. पण, नंतर याला ऑप्शनल सांगण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.