आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप:व्हिडिओ चॅटला भारतीयांची पसंती; 55 लाख वेळा डाऊनलाेड ‘आराेग्य सेतू’

लंडन/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गेमिंग, पेमेंट, चॅटिंग अॅपचाही वापर वाढला

काेराेनाच्या संकटामुळे लाॅकडाऊनदरम्यान भारतीय आराेग्याबाबत सर्वाधिक जागरूक झाले आहेत. त्याशिवाय भारतात व्हिडिआे चॅट व गेमिंगचाही जाेरदार वापर केला जात आहे. एका आठवड्यात आराेग्य सेतू अॅप ५५ लाख वेळा डाऊनलाेड करण्यात आले आहे. दुसरीकडे व्हिडिआे चॅट अॅपला आठवडाभरात ४२ लाखांहून जास्त वेळा डाऊनलाेड करण्यात आले आहे. वेगवेगळ्या अॅपसाठी हा आकडा वेगवेगळा आहे, परंतु आराेग्यविषयक अॅप सर्वाधिक वेळा डाऊनलाेड करण्यात आले. त्याशिवाय गेमिंग व चॅटिंग अॅपचाही वापर वाढला.

कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी लुडाे, कॅरम

लाॅकडाऊनमुळे आलेला कंटाळा दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वत:ला व्यग्र करण्यासाठी लुडाे, कॅरमसारख्या गेमिंग अॅपही डाऊनलाेड केले आहेत. वर्क फ्राॅम करणाऱ्यांतही व्हिडिआे चॅटला पसंती आहे.

अॅप डाऊनलोड

आरोग्य सेतू 55 लाख

व्हिडिआे चॅट 42 लाख

लूडो 38 लाख

कॅरम 28 लाख

टिकटॉक 26 लाख

पेमेंट 22 लाख

व्हिडिआे शेयरिंग 21 लाख

चॅट अॅप 18 लाख

बातम्या आणखी आहेत...