आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Indians Use The Most Data In The World, But It Benefits Foreign Companies Instead Of India, Claim In Asia Center Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशिया सेंटरच्या अहवालात दावा:जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; पण लाभ देशाऐवजी मिळतो परदेशातील अनेक कंपन्यांना!

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण आशियात वापरात येणारी केवळ 8.8 टक्के संकेतस्थळे या क्षेत्रातील होस्ट
  • एक भारतीय दर महिन्याला वापरतो सरासरी 12 जीबी डेटा

भारतीयांचा जगभरात सर्वात जास्त डेटा वापरणाऱ्यांत समावेश होतो. परंतु आमच्या डेटा वापराचा मुख्य लाभ अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात होतो. एस्या सेंटरद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०१९ मध्ये भारतीय लोक दर महिन्याला सरासरी १२ जीबी डेटाचा वापर करत होते. २०२५ पर्यंत हा आकडा प्रति महिना २५ जीबीपर्यंत पोहोचला. परंतु हा डेटा बहुतांश परदेशात होस्ट करणाऱ्या सर्व्हरवर खर्च होताे.

भारतीयांद्वारे होणाऱ्या डेटावरील खर्चाचा अतिशय अल्प वाटा भारतीय उत्पादन किंवा सेवेसाठी वापरला जातो. त्याचा मोठा वाटा अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मिळतो. एवढ्या मोठ्या इंटरनेट बाजारपेठेचा योग्य वापर करण्यात भारत त्यादृष्टीने अयशस्वी ठरल्याचे दिसते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल तयार करण्याच्या प्रकल्पात निर्माता शेखर कपूर यांचाही सहभाग होता. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळांपैकी केवळ ८.८ टक्के संकेतस्थळांचे होस्ट या दक्षिण आशियात आहेत. म्हणजेच उर्वरित सर्व संकेतस्थळ बाहेरील देशात आहे. पूर्व आशियात ही प्रमाण ४२ टक्के व अमेरिका-कॅनडात ७४.२ टक्के आहे. भारताच्या अंतर्गत मार्केटने परदेशी प्लॅटफॉर्मद्वारे तयार स्थानिक कंटेटला हातोहात घेतले आहे. त्यावरून येथे खूप जास्त क्षमता आहे, हे लक्षात येते. परंतु परदेशी कंपन्या व स्थानिक कंपन्यांत मोठे अंतर आहे. हे अंतर भरून काढण्याची गरज आहे. अहवालात आेटीटीबाबत काही वक्तव्य करण्यात आले आहे. उद्योगाने एकजूट होऊन एक निकष तयार करायला हवा. त्याशिवाय ग्राहकांकडे कंटेटबाबत संपूर्ण माहिती व तंत्रज्ञानाचे नियंत्रण असायला हवे. अशा प्रकारच्या संहिता तयार झाल्यास लहान मुलांचाही वाईट आशयापासून बचाव करता येऊ शकेल. माहितीची गुणवत्ता व माहिती तयार करणाऱ्याला जास्तीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भारताने हार्डवेअर क्षमतेत वाढ करण्याची गरज

भारताने आपल्या हार्डवेअर क्षमतेत वाढ करावी. सोबतच भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला पिछाडलेली असल्याचा शेराही अहवालात देण्यात आला आहे. त्याशिवाय भारत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे व्यापारीकरण व मोनेटायझेशनमध्ये देखील पिछाडीवर आहे. अमेरिका व चीनमध्ये मिळून बनत नाहीत एवढ्या चित्रपटांची निर्मिती भारतात होते. असे असले तरी त्यातून अपेक्षित एवढे उत्पन्न मिळत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser