आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Tech auto
 • Tech
 • JioFiber Announces 30 Day Free Trial For All New Users, New Fiber Optic Internet Plans 12 OTT Apps Membership Free

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिओ फायबर:रिलायंसने लाँच केले सर्वात स्वस्त अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लॅन; 300 Mbps पर्यंतच्या इंटरनेटसह 12 पेड OTT अ‍ॅप्सची मेंबरशिप सुद्धा मोफत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1 सप्टेंबरपासून सेवा घेणाऱ्यांना महिनाभर मोफत इंटरनेट आणि या सुविधा

रिलायंस इंडस्ट्रीजची टेलिकॉम सेक्टर कंपनी जिओ फायबर (JioFiber) ने सर्वात स्वस्त अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये लोकांना 399 रुपयांत अमर्याद इंटरनेटची ऑफर दिली आहे. सोबतच, नवीन ग्राहकांना 30 दिवसांचा मोफत ट्रायल सुद्धा दिला जाणार असल्याची यावेळी घोषणा करण्यात आली आहे.

असे आहे 'नवीन इंडियाचा नवा जोश' प्लॅन

कोरोना काळात बहुतांश लोक घरातून महत्वाची कामे करत असताना त्यांना विश्वसनीय इंटरनेट कनेक्शन गरजेचे आहे. जिओ फायबरने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या (NAYE INDIA KA NAYA JOSH) मोहिमला घरातून काम करणाऱ्यांना टार्गेट केले आहे. सध्याच्या संकट काळातही जास्तीत जास्त सेवा आणि नवीन टॅरिफ देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन प्लॅनमध्ये काय-काय मिळेल?

1. अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा

2. हाय स्पीड इंटरनेट

3. फक्त 399 प्रति महिन्याचे प्लॅन सुरू

4. कुठलीही अतिरिक्त फी नाही

5. टॉप 12 पेड OTT अ‍ॅप्सची मोफत मेंबरशिप

फ्री ट्रायल दरम्यान काय मिळेल?

 • नवीन ग्राहकाला 150 Mbps स्पीड
 • 4k सेट टॉप बॉक्ससोबत 10 ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्सन मोफत
 • मोफत व्हॉइस कॉलिंगची सुविधा
 • ग्राहकाला सेवा पसंत नसल्यास परत घेतली जाईल, कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही
 • 1 सप्टेंबरपासून सुरू करणाऱ्यांना मिळणार या सुविधा

जिओ फायबर प्लॅनची किंमत

 • जिओ फाइबरच्या प्लॅनची सुरुवात 399 रुपये प्रति महिन्यापासून 1,499 रुपयांपर्यंत राहील.
 • 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 Mbps चा डेटा मिळेल.
 • 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps डेटा
 • 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 Mbps डेटा
 • 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 Mbps डेटा स्पीड आणि टॉप 12 पेड ओटीटी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शन

जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितल्याप्रमाणे, जिओफायबर आधीच देशाची सर्वात मोठी फायबर ऑप्टिक इंटरनेट प्लॅन प्रोव्हायडर कंपनी बनली आहे. आम्ही 10 लाख घरांमध्ये पोहोचलो. आता प्रत्येक घरात पोहोचून देश सशक्त बनवणे हीच आमची इच्छा आहे.