आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Koo APP Vs Twitter Differences; Koo App Co Founder Mayank Bidawatka Interview To Dainik Bhaskar; Speaks On Funding And Data Serve

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सरकार ट्विटरबद्दल न बोलता आमच्याबद्दल बोलायला लागले; वर्षाच्या अखेरिस 25 भाषेत काम करणार- 'कू' अॅपचे सहसंस्थापक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सध्या मायक्रो ब्लॉगिंग अॅप 'कू' चर्चेत असून देशातील मोठ-मोठे लोक या अॅपशी जोडले गेले आहेत. 'कू' अॅप कंपनीने यावर्षी 10 कोटी युझर्स जोडण्याचे लक्ष ठेवले आहे. या अॅपचे प्रॉडक्ट डेव्हलमेंट आणि मार्केटींग पाहणारे को-फाऊंडर मंयक बिद्वतका यांनी दिव्य मराठीशी बोलताना या अॅपसंबंधी काही गोष्टी शेअर केल्या.

'कू'चा प्लॅन काय होता आणि याचा अर्थ काय?

'कू'चे सहसंस्थापक मंयक बिद्वतका सांगतात की, 'कू' स्थापन करण्याच्या अगोदर आम्ही शहरी भारतीयांसाठी काम करणाऱ्या एका कंपनीसाठी काम करत होतो. यामाध्यमातून बसचे ऑनलाईन टिकट काढले जायचे. आम्हाला भाषेची मर्यादा ओलांडत 100 कोटी भारतीयांना फायदा होईल असे काहीतरी करायचे होते. कारण भारत देशात सर्वात जास्त भाषा बोलली जाते. अशात आम्हाला एक असा प्लॉटफॉर्म गरजेचा होता, ज्याचा संपूर्ण भारतीयांना फायदा होईल. हे लक्षात घेत आम्ही 'कू' अॅपची निर्मिती केली.

नावाच्या स्पष्टीकरणावर ते सांगतात की, आम्हाला असे नाव हवे होते, जे सर्व लोकांना समजेल. संदेश पाठवण्यासाठी आधीपासून कबूतर पक्षाचा वापर केला जायचा. आम्हाला अशाच प्रकारच्या एका पक्षाच्या लोगोची गरज होती आणि आम्ही पिवळ्या रंगाच्या पक्षाला पसंती दिली. कारण, पिवळा रंग सकारात्मकता प्रतिक मानला जातो.

'कू' अॅप आणि ट्विटरमध्ये फरक काय?
जेव्हा कोणताही व्यक्ती 'कू' अॅपवर जातो, तेव्हा त्याला भाषेचे विविध पर्याय दिसतात. त्यामुळे, तो लवकर रिअॅक्ट होतो. पण ट्विटरवर बघितले तर फक्त सेलिब्रिटी व्यक्तीचं दिसत असून सर्वसामान्य लोक यावर नजरेस पडत नाहीत. याऊलट, 'कू' अॅपवर सामान्य लोक असल्यामुळे फॉलोअर्स वाढण्यास मदत होते.

'कू' अॅपचे किती युझर्स आहे?

मागील महिन्यात या अॅपवर 15 लाख युझर्स जोडले गेले असून युझर्सची संख्या आता 45 लाखांवर गेली आहे. आता आमचे ध्येय 10 कोटी युझर्स जोडण्याचे आहे.

या अॅपचा वापर कोणत्या देशात केला जातो?
या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे अॅप भारतीय नागरिकांसाठी तयार करण्यात आले होते. परंतु, इतर देशातील 1% युजर्सदेखील याचा वापर करतात. या अॅपची भूमिका अशी होती की, आम्हाला या प्लॉटफॉर्मव्दारे देशातील समस्या कमी करायच्या होत्या.

या अॅपमध्ये कोण-कोणत्या भाषांचा समावेश आहे

या अॅपमध्ये सध्या सात भाषा असून हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली आणि मराठी भाषांचा त्यात समावेश आहे. या अॅपवर वापरकर्त्यांना 140 शब्दांत संदेश पाठवता येते आणि व्हॉईस आणि व्हिडिओ संदेशांचा पर्याय उपलब्ध आहे. या वर्षाच्या अखेरिस हे अॅप 25 भाषेत असणार आहे.

चीन कंपनी मिळणारी निधी बंदी झाली आहे का? चीनची एकमेव कंपनी शुनवेई या अॅपमध्ये एक अंकी गुंतवणूक असून ती सुमारे अडीच वर्षापूर्वी झाली होती. त्यावेळी चीनी कंपन्यांवर भारताकडून बंदी घालण्यात आली होती. ही शुनवेई कंपनी काही दिवसांनी आपले सर्व शेअर भारतीय कंपन्यांना विकणार आहे.

शेतकरी आंदोलनांचा कू अॅपला काय फायदा मिळाला

शेतकरी आंदोलनांमुळे आम्हाला सर्वात जास्त फायदा झाला असून सरकार ट्विटरवरकडे लक्ष न देता आमच्याकडून अपेक्षा करत आहे. कारण, सरकार आणि ट्विटरमध्ये झालेल्या वादांमुळे सरकारला आत्मनिर्भरचे महत्व कळाले आहे. आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला येथील समस्या चांगल्या रितीने माहीत आहे.

अॅपला हॅकिंगपासून वाचवण्यासाठी काय योजना आहेत?

मयंक पूढे म्हणाले की, या अॅपवर येणाऱ्या सर्व मोठ्या लोकांना व्हेरिफाईड केले जात असून युजर्सला बनावट प्रोफाईलची शंका आल्यास त्याचा अहवाल आम्हाला पाठवू शकतात. आमची सिक्योरिटी ही ए क्लास असून खूप लोकांनी अॅपला हॅक करण्याचा प्रयत्न केला. आमचे वैशिष्टे म्हणजे कोणीही आमच्या अॅपमध्ये प्रवेश करून नावात बदल करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...