आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक्नॉलॉजी:महामारीच्या काळात आपल्या ई-मेलमध्ये करा काही बदल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ई-मेलची सुरुवात थेट कामाची चर्चा सुरू न करता समोरच्या व्यक्तीची आपुलकीने चौकशी करूनही होऊ शकते

लेखिका आणि ब्रँड स्पेशालिस्ट जेनिफर वूड यांनी नुकतेच आपल्या एका ट्विटमध्ये सांगितले की, त्यांनी आपल्या ई-मेलच्या सिग्नेचरमध्ये स्टे वेल जोडले आहे. यामागील कारण सांगताना त्या म्हणतात की, सध्याच्या काळात आपण एकमेकांची मदत करू शकत नसलो तरी आपण इतरांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी प्रेरित करू शकतो. आता कोविड-१९ आपल्या चर्चेचा भाग झाला असल्याने ही बाब लक्षात घेता आपल्या ऑफिशिअल किंवा वैयक्तिक ई-मेलची सुरुवात थेट कामाची चर्चा सुरू न करता समोरच्या व्यक्तीची आपुलकीने चौकशी करूनही होऊ शकते.

निरोगी आयुष्याची प्रार्थना करा

महामारीच्या काळात आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. यामु‌ळे कोणालाही मेल करताना सर्वात आधी समोरच्या व्यक्तीच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना करा. हरकेन कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर विलिअम रोज यांच्यानुसार, हा काळ अत्यंत भीतीदायक आणि अनिश्चित असा आहे. अशावेळी इतरांबद्दल आपली काळजी व्यक्त करणे, हा चांगल्या वर्तणुकीचा भाग आहे. यामुळे तुम्हाला के‌वळ कामाशी घेणे-देणे नसून समोरच्या व्यक्तीची काळजी असल्याचे यातून निदर्शनास येतील.

काळजी दर्शवणेही व्यवसायाचा भाग

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरीत्या ओळखत नसाल आणि ती व्यक्ती तुमच्याशी केवळ व्यवसायाच्या हेतूने जोडली गेली असेल तरी तुम्ही ई-मेलच्या सुरुवातीला त्या व्यक्तीला आरोग्य आणि सुरक्षेबाबत विचारा. एकमेकांशी जोडले जाणे हा मानवी स्वभाव आहे आणि अशा संकटाच्या काळात तर आपुलकीने विचारपूस करण्याचे मूल्य इतर काळापेक्षा जास्त आहे. सध्याच्या काळात आयसोलेशन आणि एकटेपणातून अनेक जण जात आहेत. यामुळे काळजी केल्याने समोरच्यालाही चांगले वाटेल. लोकांशी जवळीक साधण्याचा हा चांगला पर्याय आहे. मात्र, अशावेळी काही गंमत करत असाल तर शब्द जपून वापरा. अन्यथा या गंभीर परिस्थितीत तुमच्या गंमतीचे एखाद्याला वाईटही वाटू शकते.

मुख्य मुद्दा सब्जेक्ट लाइनमध्ये लिहा

विलियम रोज सांगतात की, तणावाच्या या वातावरणात आपला ई-मेल स्पष्ट आणि थोडक्यात असणे पूर्वीपेक्षा आणखी महत्त्वाचे झाले आहे. सध्याच्या काळात तुमचा मेल स्किप केला जाण्याचीही शक्यता आहे. अशावेळी मेलचा मुख्य मुद्दा सब्जेक्ट लाइनमध्ये लिहिलेला असावा. कारण तुमच्या मेलचे महत्त्व लक्षात येईल आणि त्याकडे दुर्लक्ष होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...