आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवीन सर्व्हिस:तुम्ही नेटफ्लिक्सवर विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट, या सेवेचा लाभ कसा घ्यावा येथे जाणून घ्या

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन मेंबर्स जोडण्यासाठी ही ऑफर आणली आहे

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर आता तुम्ही फ्री मध्ये ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांचा लाभ घेऊ शकता. सध्या नेटफ्लिक्स आपल्या युजर्सला अनेक ओरिजिनल सिरीज आणि चित्रपट फ्री मध्ये प्रदान करत आहे. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन मेंबर्स जोडण्यासाठी ही ऑफर घेऊन आली आहे.

कोणते चित्रपट फ्री मध्ये पाहता येतील?

नेटफ्लिक्सवरील फ्री चित्रपटांमध्ये स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव्ह इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), आवर प्लॅनेट (Our Planet) आणि ग्रीक अॅण्ड फ्रेन्की (Grace and Frankie) इत्यादींचा समावेश आहे.

चित्रपट सर्व भाषांमध्ये पाहू शकता

कंपनीच्या या ऑफर अंतर्गत युजर्स चित्रपटांनी सर्व भाषांमध्ये पाहू शकतील. दरम्यान कोणत्याही ओरिजिनल सिरीजचा पहिला सीझनचा पहिला एपिसोड तुम्हाला पाहता येईल. यासाठी नेटफ्लिक्सचे अकाउंट असणे आवश्यक नाही. सध्या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन प्लॅन 199 ते 799 रुपयांच्या दरम्यान आहे.

कंपनीची ही ऑफर जागतिक स्तरावर आहे

कंपनीची ही ऑफर जागतिक स्तरावर आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला netflix.com/watch-free लिंकवर जा. ही ऑफर ब्राउजर आणि कॉम्प्युटरसह विंडोज पीसी, मॅक, अँड्रॉइड डिव्हायसेस, स्मार्ट टीव्ही आणि फायर स्टिकवर उपलब्ध आहे.

YouTube देखील विनामूल्य शो देते

नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देखील कंपनीने आपल्या काही ओरिजिनल्सच्या पहिल्या भागाचे विनामूल्य अॅक्सेस भारतात उपलब्ध करुन दिले होते. केवळ नेटफ्लिक्सच नाही तर यूट्यूबवर देखील फ्री मध्ये शो देते.