आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचा पुढाकार:आता पासवर्डचा वैताग संपणार; पास-कीमुळे लाॅग इन करणे सोपे

नवी दिल्ली | मुकेश काैशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या अकाउंटला लाॅग इन करण्यासाठी आता अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. गुगलच्या सर्व प्लॅटफाॅर्मचे अकाउंट पास-कीने सुरू हाेऊ शकतील. पास-की पासवर्डची जागा घेईल. फिंगर प्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रिन लाॅक पिनच्या वापराने अॅप्स सुरू हाेतील. म्हणजे अनेक कुलपांची एकच चावी. अॅपल व मायक्राेसाॅफ्ट पास-की तंत्रज्ञानावर काम करत आहेत. हे तंत्रज्ञान वर्षभरात वापरात येऊ शकते.

पास कीची वैशिष्ट्ये : फिशिंग, सिम स्वॅपद्वारे पासवर्डची चाेरी हाेऊ शकत नाही. टू स्टॅप व्हेरिफिकेशनने जास्त सुरक्षित कारण त्यात बायाेमेट्रिकचा वापर स्वतंत्र डिव्हाइसमध्ये स्वतंत्र पास-की ठेवता येणार. पास-की क्लाउडमध्ये स्टाेअर हाेईल.

पास-कीचे आव्हान : क्राेम सध्या पास-की स्मरणात ठेवू शकत नाही पास-कीचे एक्स्चेंज अँड्राॅइड व आयआेएसमध्ये हाेत नाही. नाॅन कॅमेरा किंवा नाॅन टच सेन्सिटिव्ह डिव्हाइसमध्ये पास-की चालणार नाही.

प्रायव्हसीबद्दल माेठे प्रश्न : गुगलच्या म्हणण्यानुसार पास-की युजरकडे राहील. पण सायबर तज्ज्ञ हरीश चाैधरी म्हणाले, प्रायव्हेट डिटेल स्टाेअरेजच्या काही शंका कायम आहेत.