आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सुमारे २७ कोटी लोक मोबाइलवर विविध गेम खेळतात. पब्जीने गेल्या महिन्यात आपल्याकडून १५ कोटींची कमाई केली. पब्जीच्या डाऊनलोडिंगमध्ये सर्वाधिक वाटा आपलाच आहे. पब्जी गेमवर देशात नुकतीच बंदी घातली आहे. जाणून घ्या देशातील गेमिंगशी संबंधित आवश्यक बाबी
> 9000 कोटी रु. एवढा महसूल विविध गेम कंपन्यांना मोबाइल गेमद्वारे भारतात मिळणार.
> 26.9 कोटी पेक्षा जास्त गेमर्स २०१९ मध्ये देशात होते. २०१८ मध्ये ही संख्या २५ कोटी होती.
> 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइलवरील गेम खेळण्यात प्रत्येक भारतीय घालवतो.
> 45% मोबाइल गेमर्स महिला आहेत, तर देशात ३०% पेेक्षा जास्त गेमर्स ३५ पेक्षा जास्त वयाचे आहेत.
मोबाइल गेम कसे करतात कमाई
> पेड गेम्स विकत घ्यावे लागतात किंवा सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.
> काही गेम मोफत असतात. मात्र नेक्स्ट लेव्हल खेळण्यासाठी, नवीन शस्त्रांसाठी, कॉस्मेटिक
स्किन्ससाठी पैसे द्यावे लागतात.
> नेक गेम मोफत खेळण्यासाठी जाहिराती बघाव्या लागतात.
ग्राउंड रिपोर्ट... या प्रकारे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त
आजोबांचे २.३४ लाख खर्च केले
नवी दिल्लीत राहणारा १५ वर्षीय मुलगा गत एक वर्षापासून पब्जी खेळत होता. मात्र, तो रँक मिळवू शकला नव्हता. रँक मिळवण्यासाठी, वेगळे प्लेअर निवडण्यासाठी, वेगळ्या लूकसाठी त्याला यूसीची (खेळण्यासाठी नवीन शस्त्रे आणि जॅकेट) आवश्यकता होती. हे घेण्यासाठी त्याला पैशाची गरज भासली. त्याने आजोबांचे डेबिट कार्ड घेऊन ते पेटीएमसोबत लिंक केले. यानंतर गरजेनुसार तो यूसी खरेदी करत राहिला. ८ सप्टेंबरला मोबाइल आजोबांजवळ ठेवला होता. तेव्हा खात्यातून २५०० रुपये काढले असून २२५ रुपये शिल्लक असल्याचा मेसेज मोबाइलवर आला.
३ वाजेपर्यंत गेम खेळला, नंतर फाशी
कोटा येथे राहणारा १४ वर्षीय राज (बदललेले नाव) पब्जी आणि इतर गेम खेळायचा. तो तणावात असायचा. कोट्यातील रेल्वे कॉलनीचे सीईओ हंसराज सांगतात, राज ५ जूनला रात्री ३ वाजेपर्यंत गेम खेळत होता. रात्री ३ वाजता त्याने मला झोप येत नसून मी कॉम्प्युटर रूममध्ये काम करण्यासाठी जात असल्याचे भावाला सांगितले. ६ जूनला सकाळी ५.३० वाजता कॉम्प्युटर रूममधील दिवे सुरूच असल्याचे राजच्या आईच्या निदर्शनास आले. दाराची कडी आतून लावली असल्याने खिडकीतून बघितल्यानंतर मुलाने फाशी घेतल्याचे आईने बघितले.
स्रोत: स्टॅटिस्टा, मोबाइल मार्केटिंग असोसिएशनचा अहवाल, सेन्सर टॉवर, मीडिया रिपोर्ट्स.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.