आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गूगल प्ले स्टोअरवरुन 'सिग्नल' अॅपची डाउनलोंडिग 5 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. जर तुम्ही या अॅपवर आला असाल, तर आम्ही तुम्हाला या अॅपबद्दल सर्व माहिती देणार आहोत.
अॅप इन्स्टॉलेशन आणि इंटरफेस
अॅप इन्स्टॉलेशन: अॅपला इन्स्टॉल केल्यानंतर युझरला आपला मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर ओटीपीच्या मदतीने तुम्हाला अॅपमध्ये लॉगइन करता येईल.
अॅपचे इंटरफेस: अॅप ओपन झाल्यानंतर होम स्क्रीनवर त्या युझर्सचे नाव दिसेल, ज्यांनी हे अॅप इन्स्टॉल केले आहे. तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टवर जाऊन चॅटींग सुरू करू शकता.
सेटिंग्स: टॉप-राइटमध्ये 3 डॉट आहेत. जेव्हा यावर टॅब केले जाईल, त्यानंतर एक लिस्ट ओपन होईल. यात न्यू ग्रुप, मार्क ऑल रीड, इनवाइट फ्रेंड्स आणि सेटिंगचे ऑप्शन आहे.
अॅपचा टॉप मेनू
ग्रुप कसा बनवायचा: यासाठी न्यू ग्रुपवर जा. आता ग्रुपमध्ये ज्या कॉन्टॅक्टला अॅड करायचे आहे, त्यांना सलेक्ट करा. आता ग्रुपला नाव देऊन प्रोफाइल फोटो लावा. आता CREATE वर टॅब करा. ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सला अॅड करण्यासाठी ग्रुप सेटिंगमध्ये जाऊन Add members वर टॅब करा.
मार्क ऑल रीड: जर तुम्हाला अॅपवर अनेक मेसेज येत आहेत आणि तुम्हाला त्याला वाचायचे आहे, तेव्हा Mark all read वर टॅब करा. कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसमोरून मेसेजचे नंबर निघून जाईल.
इनवाइट फ्रेंड्स: जर तुम्हाला अॅपवर तुमच्या फ्रेंड्सला इनवाइट करायचे असेल, तर या ऑप्शनचा वापर करुन तुम्ही त्यांना इवाइट करू शकता. यावरील अॅप लिंक तुम्ही शेअर करू शकता. या लिंकला तुम्ही फेसबुक मेसेंजर, मेसेज, ईमेल, वॉट्सअॅप, हँकआउट, टेलीग्राम किंवा इतर अॅपवर शेअऱ करू शकता.
सिग्नलची सेटिंग
अॅपच्या सेटिंग मेनुमध्ये प्रोफाइल फोटो आणि नाव बदलण्यापासून SMS, नोटिफिकेशन, प्रायवसी, स्टोरेज, हेल्पसह एकूण 11 ऑप्शन मिळतात.
प्रोफाइल फोटो बदलने: यासाठी तुमच्या नावाच्या मेन्युवर टॅब करा. यानंतर तुम्ही आपले नाव बदलू शकता. याशिवा, फोटोच्या आयकॉनवर टॅब करुन आपला फोटो बदलू शकता.
SMS आणि MMS: या मेनुमध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतात. पहिल्या ऑप्शनद्वारे तुम्ही सिग्नलला फोनचे डिफॉल्ट SMS अॅप बनवू शकता. त्या खाली SMS डिलीव्हरी ऑप्शन आहे. सर्वात खाली वाय-फाय कॉलिंग कम्पेटिबिलिटी मोड आहे. तुम्हाला वाय-फायवर MMS सर्विस सुरू करू शकता.
नोटिफिकेशन: या मेनुमधून तुम्ही नोटिफिकेशनला मॅनेज करू शकता. वायब्रेशन, LED कलर, साउंड, चॅट साउंडदेखील बदलू शकता.
प्रायवसी: येथे तुम्हाला अॅप एक्सेस, कम्युनिकेशन, सेंडर आणि सिग्नल पिनशी संबंधित सेटींग मिळते. जर तुम्हाला तुमच्या अॅपला सिक्योर करायचे आहे, तेव्हा स्क्रीन लॉक, स्क्रीन सिक्योरिटी आणि कीबोर्डला ऑन करू शकता. कम्युनिकेशनमध्ये डिफॉल्ट सेटिंग ठेवा. येथे एखाद्या युझरला ब्लॉक करायचे असल्यास करू शकता.
अपीरियंस: येथून अॅपची थीम लाइट किंवा डार्क करू शकता. येथेच तुम्हाला भाषा बदलण्याचा पर्यायदेखील मिळेल.
चॅट अँड मीडिया: येथून तुम्ही मीडिया डाउनलोडिंगच्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता.
स्टोरेज: येथून तुम्हाला अॅपचे स्टोरेज आणि फोन स्टोरेजशी संबंधित माहिती मिळू शकेल. यातून तुम्ही मेसेजची लाइफ ठरवू शकता.
लिंक्ड डिवाइस: या मेनुतून तुम्ही आपल्या अॅपला डेस्कटॉपवर लिंक करू शकता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.