आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्टफोन आपल्या माध्यमातून आपणा सर्व जणांना कुटुंब आणि आॅफिससाेबत २४ तास जुळवून ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावरून काॅल लावून पाहा किंवा इंटरनेटचा वापर करा. मात्र, याचीही काही मर्यादा असते. कारण, नेटवर्क असल्याशिवाय आपण हे काम करूच शकत नाही. त्यामुळेच नेटवर्कचेही याेगदान यात महत्त्वाचे आहे. स्पेसएक्स, वनवेब आणि अॅमेझाॅनसारख्या कंपन्यांनी आता यावरच काम करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अविरत सेवा मिळावी. यात काेणत्याही प्रकारचा अडसर निर्माण हाेऊ नये आणि नेटवर्कही चांगले राहावे, यासाठी या सर्व कंपन्या आता सॅटेलाइटच्या माध्यमातून स्मार्टफाेन चालवण्याचा नवा प्रयाेग साकारण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासाठी या सर्व कंपन्यांनीही गुंतवणूक केली. यातूनच आता नेटवर्क खंडित हाेण्याची सातत्याने भेडसावणारी डाेकेदुखी याच्या माध्यमातून दूर हाेणार आहे. त्यामुळेच हा प्रयाेग सर्वांसाठीच अधिक लाभदायी ठरणार आहे. याच सॅटेलाइट प्रणालीसाठी आता जमिनीवर छाेटे रिसीव्हिंग स्टेशनाची गरज लागते. त्यामुळे या स्टेशनच्या माध्यमातून ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या एएसटी अँड सायन्स या कंपनीने पुढाकार घेतला. हीच कंपनी यावर काम करत आहे. याच सॅटेलाइट सिग्नलच्या अॅक्सेसने आता फाेनवरही सेवा घेऊ शकणार आहाेत. त्यामुळे ही सेवा माेबाइलमधील खंडित नेटवर्कची समस्या दूर करेल, असा विश्वास संस्थापक एबेल एवेलैन यांनी व्यक्त केला आहे.
व्हाेडाफाेन, सॅमसंगसारख्या कंपन्यांचे प्रोजेक्टवर काम
या वर्षीच्या मार्च महिन्यात टेलिकाॅम कंपनी व्हाेडाफाेन आणि जपानी कंपनी राकुटेननेही याच प्राेजेक्टमध्ये गुंतवणूक केली. प्रसिद्ध कंपनी सॅमसंगनेही आता प्राेजेक्टमध्ये एवेलैन यांना साेबत देण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय अमेरिकेतील कंपनी अमेरिकन टाॅवर ही जगभरातील वायरलेस कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.