आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्टडी @ होम :ऑनलाइन क्लास घेत आहात? या टिप्स ठरतील फायदेशीर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घ्या ऑनलाइन कोर्सेसचा पूर्ण फायदा

कोविड-१९ महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता विद्यापीठांनी आता ऑनलाइन क्लासेस सुरू केले आहेत. मात्र, महाविद्यालयात वर्गात बसून शिकणाऱ्यांसाठी आता घरात बसून एकट्याने शिकणे, माहितीसाठी इंटरनेट चेक करणे आणि असाइनमेंट्स ऑनलाइन पूर्ण करणे सोपे नाही. दुसरीकडे सोशल मीडिया फीड्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसच्या भडिमारामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. अशावेळी या टिप्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.

 
जुन्या पद्धतीने बनवा नोट्स - एक ऑनलाइन लेक्चर किंवा प्रेझेंटेशन बघून नोट्स काढत असाल तर लॅपटॉपवर टाइप करण्याऐवजी पेन आणि कागदाचा वापर करा. संशोधनानुसार, हाताने नोट्स लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत टाइप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॉन्सेप्चुअल प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवले नाही. तसेच, टाइप करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक शब्दाला ट्रान्सक्राइब करण्याची प्रवृत्ती दिसून आली. जे माहिती आपल्या शब्दात प्रोसेस करणे व रीफ्रेम करण्याऐवजी तुमच्या लर्निंगवर परिणाम करते.


काही अंतराने ब्रेक घ्या - ऑनलाइन शिकताना ब्रेक घ्यायला विसरू नका. एमआयटी स्लोनचे सिनियर लेक्चरर बॉब पोजेन सांगतात की, ७५ ते ९० मिनिटे काम केल्याने तुमच्या मेंदूला दोन मोड्समध्य काम करण्यासाठी मदत करते. पहिले म्हणजे लर्निंग किंवा फोकस आणि दुसरे कंसोलिडेशन. टास्क केल्यानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घेतल्यास केलेला अभ्यास लक्षात राहतो.


अडथळ्यांकडे करा दुर्लक्ष : जर ट्विटर, नेटफ्लिक्स किंवा व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्ममुळे तुमचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर असे अनेक अॅप्स आहेत जे तुमची ही समस्या दूर करतील. यात फोकसमी, फ्रीडम व फॉरेस्टसारखे काही लोकप्रिय अॅप आहेत.


स्टडी प्लॅन तयार करा : एक स्टडी कॅलेंडर तयार करा. यात येणाऱ्या परीक्षा, असाइनमेंट्स सबमिट करण्याची तारीख असावी. हे आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये सेव्ह करा. अभ्यास करताना एकदा नक्की बघा. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी टू-डू लिस्ट तयार करा.

0