आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट स्पीड:व्हिडिओ कॉल करताना कॅमेरा असावा स्थिर, डाऊनलाेड बंद ठेवा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सहा साेप्या ट्रिक्सने वाढवा इंटरनेटची स्पीड

सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण घरून काम करत आहे. हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. घरी इंटरनेट असतानाही हाेम नेटवर्क सक्षम राहत नाही. अशात व्हिडिओ कॉल आणि इतर काही करताना अनेक अडचणी येत असतात. अशा वेळी सहा पद्धतीनेे आपण इंटरनेटची स्पीड वाढवू शकताे.

डाऊनलोड्स व अपडेट्स नंतर करणे फायदेशीर

ऑफिसचे काम करत असताना डिव्हाइसमध्ये अॅप्स आणि साॅफ्टवेअर अपडेट्सला बंद करा. हे नंतर अपडेट करू शकता. अनेक वेळा व्हिडिआे काॅलही सुरू असताना इतर अॅपही अपडेट हाेतात. याचा परिणाम स्पीडवर पडताे.

घरातील दुसरी डिव्हाइस बंद ठेवा, स्पीड वाढणार

अनेक वेळा एकाच वायफायवर स्मार्ट टीव्ही, दुसरे माेबाइल,लॅपटाॅप व इतर सर्व काही कनेक्ट असतात. अशात ऑफिसचे काम करताना हे सर्व दुसरे डिव्हाइस बंद ठेवा. याला अधिक नेट लागते.

राऊटरमधून केबल लॅपटॉपशी जाेडून घ्या

राऊटरमधून वायफाय कनेक्शनमध्ये स्पीड कमी मिळत असल्यास वायरलेस काम करण्याएेवजी लॅपटाॅपला केबलच्या आधार राऊटरशी कनेक्ट करा.वायफाय सुरू असताना राऊटर डिव्हाइसजवळ ठेवा.

व्हिडिआे काॅलच्या वेळी इतर काॅल टाळावे

व्हिडिअो कॉलवर मीटिंग करताना कॅमेरा स्थिर ठेवावा. फ्रेम हलत राहिल्यास अनेक अडचणीत येतात. त्याचा स्पीडवर परिणाम पडताे. याशिवाय व्हिडिआे काॅलदरम्यान इतर काॅल येणार नाही याचीही खबरदारी घेणे फायदेशीर ठरेल.

काम करताना व्हीपीएन बंद करून ठेवा

अनेक जण कॉम्प्युटर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधित वेबसाइट उघडण्यासाठी, आेळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करतात. त्यामुळेच आपण ऑफिसचे काम करत असताना व्हीपीएन बंद ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल.

काम सुरू करण्यापूर्वी व्हायरस स्कॅन करा

आपल्या लॅपटाॅपवर व्हिडिआे काॅल सुरू करण्यापूर्वी व्हायरस स्कॅन करा. फायरवॉल चांगल्या पद्धतीने कॅन्फीगर झाली तर इंटरनेट स्पीड वाढते. लॅपटाॅपवरील दुसरे अॅप्लिकेशन यादरम्यान बंद ठेवा. त्यामुळे डाटा वाचेल व स्पीड वाढेल.

टेलिग्रामवर राेज १५ लाख युजरची नवीन सदस्य नाेंद

मेसेजिंग अॅप टेलिग्रामला ४० काेटी मंथली युजर आहेत. या नव्या प्लॅटफाॅर्मला आता युजरची पहिली पसंती लाभत आहे. त्यामुळे यावर राेज १५ लाख नवीन युजरची नाेंदणी हाेताना दिसते. एका वर्षात १० काेटी युजर वाढत असतात. कंपनी यंदापासून व्हिडिआे काॅलची सुविधाही सुरू करण्याच्या तयारीत आहे. २०१३ च्या मेसेजिंगसारखीच गरज आजच्या परिस्थितीमध्ये व्हिडिआे काॅलची आहे. त्यामुळेच ही नवीन तंत्रपद्धती सुरू करणे, सर्वांसाठी अधिक फायदेशीर ठरणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...