आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसब्लॉक:सात वर्षांत दहापटीने वाढली सोशल मीडिया पोस्टची वादग्रस्त रेलचेल

नवी दिल्ली / मुकेश कौशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेटस्पीच, धोकादायक कंटेट, धमक्या आणि अश्लीलतेशी संबंधित पोस्ट वेगाने वाढल्या

तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलच्या स्टेटसवर काय लिहीत आहात, त्यामागे उद्देश काय आणि तुम्ही काय शेअर करत आहात यावर तुमच्या आई-वडिलांचे भलेही लक्ष नसेल, परंतु यात सरकारचे स्वारस्य मात्र वाढत चालले आहे. आपले विचार व भावना व्यक्त करण्यासाठी अव्वल व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकच्या अकाउंट्सबद्दल माहिती मिळवणे, शेअर कंटेंट ब्लॉक करणे किंवा सुरक्षिततेसंबंधी सरकारच्या निर्देशांसंबंधीच्या आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.

या अकाउंट्सच्या चौकशीसंबंधी आकडेवारी पाहिली तर सरकारच्या वतीने २०१३ मध्ये ४,१४४ निर्देश फेसबुकला मिळाले होते. २०१५ मध्ये कंटेंटवर बंधने घातल्याची संख्या १५ हजारांवर गेली होती. पाच वर्षे ही मालिका वाढतच गेली आणि २०२० मध्ये सरकारच्या वतीने ५७ हजारांहून अधिक अकाउंंट्सची माहिती घेण्यासंबंधी निर्देश मिळाले. यापूर्वीच्या वर्षात ही संख्या ३३ हजार एवढी होती. व्हर्च्युअल जगात वाढवला जाणारा द्वेष, धोकादायक मजकूर, खोट्या बातम्या, बाललैंगिक शोषणाच्या प्रकरणांतून याचे गांभीर्य कळते.

एक वर्षात १७ हजार यूआरएल-कंटेंट ब्लॉक : माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानुसार गेल्या वर्षी १७ हजारांवर यूआरएल, अकाउंट, वेबपेज ब्लॉक करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक २०२० मध्ये ब्लॉक झाले, तर २०१७ मध्ये ही संख्या १,३८५ होती. चार वर्षांत ब्लॉकची ही मालिका चौपटीने वाढली.

जगात सर्वाधिक फेसबुक युजर भारतात
भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे ३२ कोटींहून अधिक फेसबुक युजर्स आहेत. अमेरिकेत १९ कोटी तर इंडोनेशियात १४ कोटी फेसबुक युजर्स आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या कारणावरून बंधने
सरकार ही कारवाई आयटी कायदा २००० च्या कलम-६९ अन्वये करत आहे. यामागे देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम ठेवण्याचा यामागे उद्देश आहे. इतर देशांशी मैत्रीसंबंध, कायदा-सुव्यवस्था राखणे, भडक मजकूर रोखणे ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ नंतर असा मजकूर ब्लॉक करण्याचा वेग तिपटीने वाढला, तर मोदी-१च्या अखेरच्या दोन वर्षांत हा वेग दुपटीहून कमी होता.
फेसबुकच्या अंतर्गत अहवालानुसार, २०१९ च्या शेवटच्या तिमाहीत धोकादायक मजकुराच्या १६ लाख पोस्ट सापडल्या, तर २०२० च्या शेवटच्या तिमाहीत ही संख्या ८६ लाखांवर गेली होती. म्हणजे एक वर्षात यात पाचपट वाढ झाली आहे. याच पद्धतीने २०१९च्या शेवटच्या तिमाहीत हेटस्पीचच्या ५५ लाख पोस्ट काढण्यात आल्या, तर २०२० च्या पहिल्या तिमाहीत ही संख्या जवळपास दुपटीने वाढून ९५ लाखांपर्यंत गेली.

इंटरनेटवर बंदी घालण्यात भारत आघाडीवर
खासगी जीवन स्वातंत्र्यावर अंकुश घालण्यासाठी इंटरनेटवर बंदी हे शासनाकडील मोठे हत्यार आहे. याबाबत भारत जगातील इतर देशांच्या पुढे आहे. फेसबुकच्या अहवालानुसार २०२० च्या पहिल्या ६ महिन्यांत जगात इंटरनेटवर बंदीची ५३ प्रकरणे नोंदली गेली. यात ४४ भारतातील होती. अशा प्रकरणांत भारताचा वाटा ८३% राहिला. २०१७ मध्ये ४७ पैकी २५ प्रकरणे इतर देशांची होती.

बातम्या आणखी आहेत...