आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टेक्नॉलॉजी :झूम अॅपवर डाटा चोरीचा धोका... मग वापरा हे अॅप्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिक्युरिटी आणि डेटा चोरीच्या बातम्यांमुळे युजर्सची चिंता वाढली आहे

घरातून काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी झूम अॅप व्हिडिओ चॅट प्लॅटफॉर्म म्हणून समोर आलेला असताना याच्याशी संबंधित सिक्युरिटी आणि डेटा चोरीच्या बातम्यांमुळे युजर्सची चिंता वाढली आहे. यामुळे तुम्ही जर दुसरे पर्याय शोधत असाल तर हे अॅप फायदेशीर ठरू शकतात.


गो टू मीटिंग

वेबएक्स प्रमाणे गो टू मीटिंग व्हर्चुअल मीटिंग्ससाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. स्टँडर्ड एंड-टू-एंड एंक्रिप्शनला ही सपोर्ट करते. १५० लोकांसह व्हिडिओ मीटिंगची सुविधा असणाऱ्या या अॅपमध्ये वेबएक्सप्रमाण वेब एक्ससारखा फ्री प्लॅन नाही. १४ दिवसांसाठी ट्रायल उपलब्ध आहे.


वेबएक्स

सिस्कोचे वेबएक्स एंड टु एंड एन्क्रिप्शनला सपोर्ट करणारे व्हिडिओ कॉलिंग अॅप आहे. हे व्यवसायाच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. यातदेखील झूूमप्रमाणे १०० जण एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात. व्यावसायिक बैठका किंवा इतर चर्चांसाठीही हे अॅप फायदेशीर आहे.


गुगल ड्युओ

गुगलने ड्युओने नुकतेच चॅट ग्रुपमधील ८ लोकांची संख्या १२ केली आहे. मोबाइल आणि वेबवर यावरून केले जाणारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहेत. तसेच गुगलकडूनही याचा डाटाचा कुठलाही वापर केला जात नाही.


इतर पर्याय

अनेक लोकप्रिय आहेत, ज्यांचा उपयोग व्हर्च्युअल मीटिंग्ज साठी करता येऊ शकतो. जसे की स्काइप (५० जणांसोबत व्हिडिओ कॉलिंग), स्लॅक (१५ जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगसाठी पेड प्लॅन) आणि फेसबुक मेसेंजर (५० जणांसह व्हिडिओ कॉलिंग) चा पर्याय उपलब्ध आहे.

0