आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:भारतात टिकटॉकची लोकप्रियता घसरली, डाऊनलोड 34% कमी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये डाऊनलोडमध्ये वाढ झाली होती

कोरोना विषाणू महामारीच्या काळात चिनी व्हिडिओ कंटेंट अॅप टिकटॉकच्या भारतातातील लोकप्रियतेत लक्षणीय घट झाली आहे. अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार एप्रिलमध्ये या अ‍ॅपचे डाऊनलोड ३४ टक्क्यांनी कमी झाले आहे. मे महिन्यात आतापर्यंत डाऊनलोडमध्ये २८ टक्के घट झाली.

यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये डाऊनलोडमध्ये वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये ७% आणि मार्चमध्ये ८% वाढले. अहवालानुसार, ३.५५ कोटी वापरकर्त्यांनी मार्चमध्ये टिकटॉक अॅप डाऊनलोड केले. मार्चमध्ये हा आकडा घटून २.३५ कोटी झाला. मे महिन्यात २३ तारखेपर्यंत केवळ १.७ कोटी वापरकर्त्यांनी हे अॅप डाऊनलोड केले.

चीनविरोधी भावनांचा परिणाम

तज्ञांनुसार, कोरोना महामारीमुळे जगभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. टिकटॉक हे चिनी अॅप असल्याने याविषयीदेखील नाराजी बघायला मिळत आहे. याशिवाय महामारीमुुळे टिकटॉकदेखील आपल्या विपणनावर कमी खर्च करत आहे. याचा परिणाम डाऊनलोडिंगवर झाला आहे. लॉकडाऊनच्या आधी टिकटॉककडून ब्रँडिंग सुरू होती. मात्र एप्रिलमध्ये यात घट झाली. मागील काळात टिकटॉक व यूट्यूब क्रिएटरमध्ये झालेल्या वादाचा परिणाम टिकटॉकच्या लोकप्रियतेवर झाला आहे. एकेकाळी टिकटॉकची रँकिंग ४.६ किंवा यापेक्षा जास्त असायची. मात्र मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही १.२ वर घसरली. सध्या १.४ आहे.

बातम्या आणखी आहेत...