सोपे तंत्र / तुमच्या आयुष्याला सुलभ बनवणारे दोन गॅजेट आणि अॅप

  • फोन-एटीएम चालवण्यासाठी मदत करेल हे विषाणुमुक्त कार्ड

दिव्य मराठी

May 14,2020 12:10:00 AM IST

रोज 10 मिनिटांच्या प्रशिक्षणाने मिळेल मायग्रेनपासून आराम

नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अॅपमुळे मायग्रेन (अर्धशिशी) च्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, दररोज १० मिनिटे या अॅपवर प्रशिक्षण घेतल्याने मायग्रेनचे प्रमाण कमी होते. हे अॅप नॉर्वेच्या सेंट ओलाव्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने एकत्रितपणे तयार केले आहे.

संशोधकांनुसार जेव्हा नर्व्हस सिस्टिम सक्रिय असते, तेव्हा हार्ट रेट, मासपेशी आणि शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. हे आपल्याला थेट जाणवत नाहीत. आपण जर वायरलेस सेन्सरने हे मॉनिटर केले तर स्वत:ला यासाठी तयार करुन वेदनांपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. यासाठी अापल्याला अॅपचा नियमितपणे वापर करावा लागेल.

फोन-एटीएम चालवण्यासाठी मदत करेल हे विषाणुमुक्त कार्ड

नुकतेच स्पेनची प्रसिद्ध कंपनी इंपॅक्टोने एक कार्ड बनवले आहे, जे कुठल्याही संसर्गित जागेला स्पर्श करण्यापासून आपल्याला वाचवू शकते. हे क्रेडिट कार्डच्या आकाराचे आहे. याद्वारे फोन, आयपॅडसारखे गॅजेट चालवता येतील. हे फायदेशीर ठरेल.

तसेच दरवाजा देखील उघडता येऊ शकतो. याचा उपयोग बॉटल ओपनर आणि एटीएममध्येही करता येईल. याच्या अँटी मायक्राबियल प्रॉपर्टीमुळे यावर किटाणू जास्तवेळ टिकत नाही.

X