‘कोविड-19' साठी तंत्रज्ञानावर दिला जातोय भर, हे बदल होत आहेत...

  • फैलाव रोखण्यासाठी हे बदल लवकरच दिसायला लागतील...

वृत्तसंस्था

Mar 21,2020 12:16:00 PM IST

1. घरातूनच काम करणे आता साधारण बाब असेल. आरोग्य आणि आर्थिक सेवांना याचा अवलंब करण्यासाठी थोडाफार कालावधी लागेल. यासाठी अत्याधुनिक टेक सुविधांची गरज भासेल. यासाठी प्रयत्न सुरू केलेेले आहेत. सेवा पुरवणाऱ्या कंपन्या असे प्लॅन्स तयार करत आहे जे स्वस्त आणि सोयीस्कर असेल.

2. जेव्हा लोक घरातून काम करतील तेव्हा इंटरनेट डाऊन असेल? हा मोठा प्रश्न आहे. तथापि सध्या अशी कुठलीही शंका नाही. ऑप्टिकल नेटवर्किंगवर गेल्या काही वर्षांत सिस्को आणि नोकिया सारख्या कंपन्यांनी मोठे काम केले आहे. यामुळे वेग आणि वापरकर्त्यांच्या संख्येच्या इंटरनेटवर परिणाम होत नाही. त्यामुळे इंटरनेट डाऊन होणे ही तर लांबची गोष्ट आहे.

3. नव्या पीढीला व्हिडिओ कोलॅब्रेशन्स लवकरच बघता येईल. त्यांचे करिअरही यावरच अवलंबून असणार आहे. शाळा आणि महाविद्यालयात तर याचा मोठा परिणाम दिसेल. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोर्स सुरू करण्याची तयारी काही शिकवण्यांकडून सुरू झाली आहे. अमेरिकेला यात रोल मॉडेल मानले जाईल. कारण येथे असे कोर्स आधीपासूनच सुरू आहेत.

4. ऑनलाइन खरेदी महाग होत आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सवर वस्तू विक्री करणारे संधीची फायदा घेऊन पैसे कमावू पहात आहेत. अशावेळी कीपा, प्राइझ हिस्ट्रीसारखे प्राइझ ट्रॅकर विकून पैसा वाचवत आहेत. कीपाचे उदाहरण घेतल्यास तर हे भारतातील ४ कोटींपेक्षा जास्त उत्पादनांच्या किमतीवर लक्ष ठेवते. आणि यातील चढ-उतार ग्राहकांना सांगते.

5. अशा वातावरणात धोकेही कमी नाहीत. कोविड-१९ डिस्काउंट्स या नावाच्या संकटाने डोके वर काढले आहे. हॅकर्सनी कोव्हीड-१९ डिस्काउंट कोड्स सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर जारी केले आहेत. यासाठी तुम्हाला एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाईल. क्लिक झाल्या बरोबरच तुमचा स्मार्टफोन हॅकरच्या ताब्यात जाईल. २०२० मध्ये सुमारे १६००० नवीन कोरोना विषाणूंशी संबंधित डोमेनची नोंद झाली आहे. यातून २००० वेबसाइट्स संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. फेसबूकसह सर्व साइट्सने कोड्स चिन्हित केले आहे. तसेच त्यांना हटवण्याचे कामही सुरू केले आहे.

6. कोरोनाशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी कोविड-१९ ट्रॅकर तयार करण्यात आले आहेत. डब्लूएचओ आणि सीडीसी सारख्या आरोग्य संस्थांचे स्वत:चे ट्रॅकर्स आहेत. यातून काही ट्रॅकर्सही मालवेअरही असू शकतात. ट्रकर डाऊनलोड करण्यास सांगणाऱ्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका.

X