आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेटवर्क प्रॉब्लेम:व्होडाफोन-आयडिया आऊट ऑफ कव्हरेज एरिया, नेटवर्क नसल्याने ग्राहकांनी तक्रारींसह ट्विटरवर शेअर केले मजेशीर मीम्स

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयडिया- व्होडाफोन नेटवर्क जे आता व्ही(VI) म्हणून ओळखले जाते, आज सकाळपासून नेटवर्क नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. हा विषय ट्विटरवर सध्या ट्रेण्डिंगला आहे. खासकरुन पुणे-औरंगाबाद आणि याच्या आसपासच्या परिसरात नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. यानंतर महाराष्ट्रातील व्होडाफोन आयडिया सीम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी कस्टमर केअर आणि ट्विटरवर कनेक्टिव्हिटीशी संबंधित अनेक तक्रारी नोंदवल्या. यासोबतच, अनेकांनी मजेशीर मीम्सही ट्वीटरवर शेअर केले.

यानंतर कंपनीकडून ग्राहकांना रिप्लायमध्ये सांगण्यात आले की, ही तांत्रिक अडचण काही काळासाठी आली आहे. आमचे कर्मचारी यावर काम करत असून, 3 तासात प्रॉब्लेम ठीक केला जाईल. दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियात मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटवर्क डाऊन झाल्यामुळे अनेकांनी मजेशीर मीम्सही शेअर केले आहेत.