आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • Vodafone Idea Tariff Hike | After Airtel Vodafone Idea Hikes Prepaid Tariff By 25 Percent For ARPU Growth Latest News And Updates

ग्राहकांच्या खिशाला कात्री:एअरटेनंतर आता व्होडाफोन-आयडियाने वाढवले प्रीपेड प्लॅन्सचे दर, 25 टक्क्यांनी केली वाढ, 25 नोव्हेंबरपासून होणार लागू

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधन दरवाढीसह महागाईची मार सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी दणका दिला. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या दरांमध्ये वाढ केल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्होडाफोन आयडियाने दरवाढीची घोषणा केली. व्होडाफोन आयडिया आता आपल्या ग्राहकांना प्रीपेड प्लॅन्ससाठी 20 ते 25 टक्के जादा दर आकारणार आहे.

व्होडाफोन आयडिया (Vi) कंपनीने आपल्या मंगळवारच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये या माहितीचा उल्लेख केला आहे. कंपनीने घोषित केलेले नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन-आयडिया आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. अशात नवीन दरांमुळे कंपनीच्या सरासरी महसूलात सुधारणा होईल असे कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे, एअरटेलने सुद्धा आपल्या ग्राहकांकडून प्रीपेड प्लॅनसाठी 25 टक्के अधिक दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहेत नवीन प्लॅन:-

एअरटेलने का वाढवल्या रिचार्जच्या किंमती
भारती एअरटेलने किंमती वाढवल्याचे कारण देत सांगितले की, चांगल्या आणि हेल्थी बिझनेस मॉडेलसाठी दर वाढवणे आवश्यक आहे. कंपनीने पुढे म्हटले की, प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200 रुपये असावा आणि नंतर तो 300 रुपयांपर्यंत वाढवावा. जेणेकरून गुंतवलेल्या भांडवलावर कंपन्यांना योग्य परतावा मिळू शकेल. व्होडाफोन-आयडियाने सुद्धा आपल्या रीचार्जचे दर वाढवताना हेच कारण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...