आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • WhatsApp Privacy Policy 2021; What Will Happen If You Do Not Accept Terms Of Service And Privacy Policy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी:युजर्सला योग्य माहिती देण्यासाठी कंपनीने कॅम्पेन सुरु केले, जाणून घ्या, 15 मे पर्यंत पॉलिसी एक्स्पेट न केल्यास काय होईल?

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सॲप आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे मागील काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहे. अनेक युजर्सने इतर प्लॅटफॉर्मवर स्विच करणे सुरु केले होते. परंतु कंपनीने मागील आठवड्यात, ते पॉलिसी अपडेट करून पुढे जातील परंतु युजर्सला संपूर्ण माहिती दिल्याशिवाय जाणार नाहीत असे सांगिलते होते.

तुम्हाला माहिती आहे का, 15 मे पर्यंत तुम्ही व्हॉट्सॲपच्या नवीन पॉलिसीला एक्सेप्ट केले नाही तर काय होईल? कंपनीने या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्या फेसबुक ब्लॉगवर दिले आहेत.

नवीन पॉलिसी एक्स्पेट न केल्यास काय होईल?

  • युजरने 15 मे पर्यंत व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी एक्स्पेट न केल्यास व्हॉट्सॲप लगेच युजरचे अकाउंट डिलीट करणार नाही. परंतु कंपनीने हेसुद्धा सांगितले आहे की, पॉलिसी एक्स्पेट करेपर्यंत सर्व फंक्शनचा लाभ मिळणार नाही.
  • काही काळ युजर्स कॉल्स आणि नोटिफिकेशन रिसिव्ह करून शकतील परंतु ॲपवरून मॅसेज वाचू शकणार नाहीत आणि पाठवूही शकणार नाहीत. काही काळाचा अर्थ असा आहे की, युजर्सने पॉलिसी मान्य केली नाही तरी काही आठवडे व्हॉट्सॲप वापरू शकतील.
  • या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप युजर्सला आणखी काही ऑप्शन उपलब्ध करून देईल. युजर्स 15 मे नंतरसुद्धा ॲपचे अपडेट्स प्राप्त करू शकतील. 15 मे पूर्वी आपली चॅट हिस्ट्री अँड्रॉइड किंवा आयफोनवर एक्स्पोर्ट करू शकतील. यासोबतच अकाउंटचा रिपोर्टही डाउनलोड करू शकतो.

अकांऊट डिलीट केल्यास परत मिळणार नाही
जर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड, आयफोन किंवा काईओएस (KaiOS) डिव्हाईससे आपले अकाउंट डिलीट केल्यास ते पुन्हा मिळणार नाही. सर्व मॅसेज आणि डेटा पूर्णपणे डिलीट होईल आणि तुम्ही सर्व व्हॉट्सॲप गृपमधूनही रिमूव्ह व्हाल. कंपनीनुसार व्हॉट्सॲप बॅकअपसुद्धा डिलीट केले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन धोरण काय आहे?
व्हॉट्सअ‍ॅप यूझर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसीव करतात, कंपनी त्याचा वापर कुठेही करू शकणार. कंपनी त्या डाटाला कुठेही शेअर करू शकेल. ही पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार होती. पण, वाद वाढल्यानंतर डेडलाइनला वाढवून 15 मे करण्यात आले. आधी दावा करण्यात आला होता की, युझरने या पॉलिसीला अ‍ॅग्री न केल्यास व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार. पण, नंतर याला ऑप्शनल सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...