आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Tech
  • WhatsApp Will Now Share Everything From Payment To Location On Facebook, Instagram; If The Conditions Are Not Met, The Account Will Be Closed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रायव्हसीतही आता घुसखोरी:पेमेंटपासून लोकेशनपर्यंत आपली प्रत्येक गोष्ट व्हॉट‌्सअॅप आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करणार; अटी मानल्या नाहीत तर अकाउंट होईल बंद

कॅलिफोर्निया/नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकशी डाटा शेअर करत नसल्याचा दावा करणाऱ्या व्हॉट्सअॅपची पॉलिसी

भारतासह जगभरातील २०० कोटी व्हॉट्सअॅप युजर्सना सध्या एक नोटिफिकेशन येत आहे. यात म्हटले आहे आहे की, ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत नव्या अटी व सेवा शर्ती आणि प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावी, अन्यथा अकाउंट डिलीट केले जाईल. म्हणजे, व्हॉट्सअॅप बंद होईल. व्हॉट्सअॅप आपली प्रत्येक माहिती मूळ कंपनी फेसबुकशी शेअर करेल, असे प्रथमच यात स्पष्ट करण्यात आले आहे. आजवर याचा व्हॉट्सअॅपने सतत इन्कारच केला आहे.

सायबर एक्सपर्टकडून समजून घ्या... बिझनेस अकाउंटहून शेअर होणाऱ्या कॅटलॉगचा अॅक्सेसही त्याच्याकडेच राहणार

> जेवढा, जेथे खर्च कराल त्या हिशेबानेच दिसतील जाहिराती

व्हॉट्सअॅप आपल्या बँकेचे नाव, रक्कम आणि डिलिव्हरीचे ठिकाण सर्वकाही ट्रॅक करेल. यामुळे फेसबुक-इन्स्टाग्रामलाही या व्यवहारांची माहिती मिळेल. यावरून कंपनी तुमचे प्रोफाइल तयार करेल. म्हणजे, तुम्ही सामोसा खात असाल तर फार श्रीमंत नाही. परंतु, स्टारबक्सला जात असाल तर तुम्ही श्रीमंत आहात. मग तुम्हाला दिसू लागतील महागड्या गाड्यांच्या जाहिराती.

> आयपी अॅड्रेस व मोबाइल नंबरवरून लोकेशन ट्रेस होईल

व्हॉट्सअॅपने लोकेशन अॅक्सेस डिसॅबल करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, वर म्हटले आहे की, तुमचा आयपी अॅड्रेस व मोबाइल नंबरवरून तुम्ही कधी-कुठे जाता याचा अंदाज येईल.

> तुमचे स्टेटसही सुरक्षित नाही, ते वाचून दाखवतील जाहिराती

व्हॉट्सअॅप आपले स्टेटसही वाचेल. यात जोखीम अशी की, “कोणती गाडी खरेदी करू’ असे तुम्ही लिहिले तर फेसबुक-इन्स्टाग्रामही ते वाचतील आणि तुम्हाला गाड्यांच्या जाहिराती दिसू लागतील.

> कुणाला किती कॉल, कोणत्या ग्रुपमध्ये सक्रिय यावर लक्ष

कुणाला किती व्हॉट्सअॅप कॉल करता, कोणत्या ग्रुपमध्ये सक्रिय, ब्रॉडकास्ट लिस्ट किती हे कंपनीला माहीत असेल. फोटो-व्हिडिओ फॉरवर्ड केल्यावर सर्व्हरवर अधिक काळ राहतील. यामुळे कोणता कंटेंट अधिक फॉरवर्ड होतो हे कळेल. फेक न्यूज ट्रॅकिंग व निवडणुकीच्या काळात ही माहिती महत्त्वाची ठरेल. बिझनेस अकाउंटवरून शेअर होणारा कॅटलॉग अॅक्सेसही व्हॉट्सअॅपकडेच.

> कंटेंटबाबत तुम्हाला सल्ला देईल, त्याचे विश्लेषणही करेल

व्हॉट्सअॅप तुमचे मित्र, ग्रुप्स, कंटेंट इत्यादीबाबत सल्ला देईल. एक प्रकारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर व्हॉट्सअॅप लक्ष ठेवेल आणि त्याचे विश्लेषण करेल. फेसबुक याआधारे तुम्हाला शॉपिंग, प्राॅडक्टच्या जाहिराती दाखवेल.

प्रायव्हसी सुरक्षा विधेयकात ८९ दुरुस्त्यांची शिफारस

इकडे भारतात प्रायव्हसीच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित वैयक्तिक डाटा सुरक्षा विधेयकात ८९ दुरुस्त्यांची शिफारस करण्यात आली आहे. यात प्रायव्हसीचे उल्लंघन केल्यास १५ कोटी दंड व ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने “खासगी जीवन’ मूलभूत अधिकार ठरवले होते. यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...