आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
व्हॉट्सअॅपची नवीन पाॅलिसी भारताच्या माहिती हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. हे धोरण टिकटॉकहून जास्त धोकादायक आहे. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करायला हवा. कारण प्रायव्हसी हा भारतीयांचा मूलभूत हक्क आहे. ४० काेटी भारतीय युजरला मात्र ब्लॅकमेल केले जात आहे. युराेपीय संघ क्षेत्रात मात्र व्हाॅट्सअॅप सर्व कायद्यंाचे काटेकाेरपणे पालन करते.
पाॅलिसी स्वीकारली नाही तर?
तुम्ही शर्ती स्वीकारल्या नाही तर ८ फेब्रुवारीनंतर अकाउंट आपाेआप डिलिट हाेईल. तुम्ही त्याच्या आधीही अॅप अनइन्स्टाॅल करू शकता.
काय दक्षता बाळगावी?
अकाउंट सेटिंगमध्ये चॅटसंबंधी मीडिया, सर्व डेटा डिलिट करून टाका. ८ फेब्रुवारीला प्रायव्हसी पाॅलिसी स्वीकारली नसल्याने अकाउंट डिलिट झाल्यावरही तुमचा डेटा व्हाॅट्सअॅपकडे तसाच राहील.
मी नवीन पाॅलिसी स्वीकारल्यास :
नवीन पाॅलिसी स्वीकारल्यास प्रायव्हसीच्या उल्लंघनाची जाेखीम असेल. व्हॉट्सअॅप तुमचे वैयक्तिक संभाषण किंवा ग्रुप चॅट वाचू शकत नाही. परंतु स्टेटस, लाेकेशन व माेबाइलच्या इतर अॅपला रीड करू शकताे. संपूर्ण माहिती फेसबुकद्वारे शेअर करेल. बँक डिटेल, क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल, लाेकेशन, आयपी अॅड्रेसचीही इतरांना देवाण-घेवाण करेल.
फाेनमध्ये काही ठेवायला नकाे :
अकाउंट इंडिव्ह्यूजअल, ग्रुप की बिझनेस अकाउंट आहे, हे नवीन पाॅलिस स्वीकारण्यापूर्वी निश्चित करा. स्मार्टफाेनमध्ये बँक अकाउंटची डिटेल, फाेटाे, आॅडियाे-व्हिडिआे, इतर दस्तएेवज ठेवू नका. जी-मेल अकाउंट इतर उपकरणांशी सिंक व्हायला नकाे.
व्हाॅट्सअॅपसाठी स्वतंत्र फाेन :
व्हाॅट्सअॅप असलेल्या फाेनमध्ये कमीत कमी वैयक्तिक माहिती असावी. त्यासाठी स्वतंत्र फाेन देखील वापरता येऊ शकतो.
माझ्याकडे काय पर्याय आहेत?:
तुम्ही पर्यायी अॅपवर शिफ्ट हाेऊ शकता. व्हाॅट्सअॅप डिलिट झाल्यानंतरही तुम्ही त्यावर राहू इच्छित असल्यास ते पुन्हा डाऊनलाेड करू शकता. पाॅलिसी स्वीकारल्यावरच चॅट पाठवू शकता.
व्हाॅट्सअॅप माहितीचे काय करेल? :
फेसबुककडे आधीपेक्षा जास्त डेटाचा अॅक्सेस असेल. त्याच्या इतर कंपन्या त्याचा वापर तुमच्यापर्यंत उत्पादने पाेहाेचवण्यासाठी करतील. त्यातून ही कंपनी लाभ कमावू इच्छिते.
बिझनेस अकाउंट रीड करते :
तुम्ही बिझनेस अकाउंट वापरत नसाल. परंतु, उत्पादन खरेदीसाठी एखाद्या मर्चंटच्या बिझनेस अकाउंटवर एखादा संदेश पाठवत असाल तर त्याची तुमच्यावर नजर राहील. कारण तेथे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेजेस नसतात. तुम्ही बिझनेस ग्रुपशी जाेडलेले असल्यास तसा धोका आहे. परंतु व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार ही पॉलिसी बिझनेस अकाउंटमधील संदेशासंबंधी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.