आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया अॅप व्हॉट्सअॅपवरील मेसेज आता सेंडिंग केल्यानंतरही एडिट करता येणार आहेत. कंपनी या फीचरवर काम करत आहे. यासाठी तुम्हाला जो मेसेज एडिट करायचा आहे त्यावर जास्त वेळ दाबून ठेवल्यास एडिट फीचरचा पर्याय दिसेल. हे फीचर टेलिग्राम अॅपवर आधीच उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत सेंड मेसेजमध्ये काही चूक झाल्यास तो केवळ तासाभरात डिलीट करता येणार आहे.
गुगल ड्युओ,गुगल मीट अॅप एकमेकांत मर्ज होणार
टेक कंपनी गुगल आपले दोन अॅप्स गुगल ड्युओ आणि गुगल मीट मर्ज करणार आहे. सध्या गुगल मीटच्या व्हिडिओ कॉलिंगची सर्व वैशिष्ट्ये ड्युओ अॅपमध्येच जोडली जातील. नंतर गुगल ड्युओ अॅपचे नाव बदलून गूगल मीट केले जाईल. यानंतर गुगलवर एकच व्हिडिओ कम्युनिकेशन सेवा असेल. गुगल ड्युओ जीमेल, मेसेंजर, गुगल कॅलेंडर असिस्टंट इत्यादींसह देखील एकत्रित केले करण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.