आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅप ऑप्शन:बंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी अ‍ॅप बंद झाल्यामुळे तुमचे काम थांबणार नाही, या अ‍ॅप्सचा वापर करून बघा

अलीकडेच देशातील चीनच्या ५९ अ‍ॅप्सच्या वापरावरील बंदी चर्चेचा विषय ठरली आहे. या बंदीमुळे टिकटॉक, झेंडर, कॅमस्कॅनर यासारखे अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहेत. कोट्यवधी मोबाइल फोन वापरकर्त्यांनी या दैनंदिन अ‍ॅप्सचा वापर बंद केल्यावर त्यांना आता या उपयुक्त ठरणाऱ्या अ‍ॅपच्या पर्यायांची चिंता सतावत आहे. जर तुम्ही यापैकी काही अ‍ॅप्स वापरत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे काम सुरू ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा काही लोकप्रिय अ‍ॅप्सचे अनेक भारतीय पर्यायदेखील उपलब्ध आहेत.

शेअरइट, झेंडरचा शेअरऑल पर्याय

हे एक अँड्रॉइड फाइल शेअरिंग अ‍ॅप्लिकेशन आहे. हे भारतीय स्टार्टअप क्वांटम ४ यू लॅबने डेव्हलप केले आहे. याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय फाइल्स, व्हिडिओ, अ‍ॅप्स इत्यादी एकमेकांना शेअर करू शकतात. यासोबतच या शेअरिंग पासवर्ड प्रोटेक्शनची सुविधा आहे. तसेच हे अ‍ॅप जंक फाइल्स, कॅश आणि डुप्लिकेट फाइल्सही क्लीन करते. हे अ‍ॅप शेअरइट प्रमाणेच काम करते. यामुळे चांगला पर्याय आहे.

कॅमस्कॅनरला पर्याय कागज स्कॅनर

हे स्कॅनर अ‍ॅप आयआयटी ग्रॅज्युएट्सने कागदपत्रे स्कॅन व शेअर करण्यासाठी तयार केले आहे. तीन स्कॅनिंग मोड्सची सुविधा असलेले हे अ‍ॅप कागद योग्यपणे स्कॅन करून तुमच्या आवडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते. याशिवाय हे अ‍ॅप एकाच वेळी अनेक कागदपत्रांना स्कॅन करू शकते. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे हे कागदपत्रावर वॉटरमार्क अॅड करत नाही.

व्हीचॅटच्या जागी हाइक स्टिकर चॅट

हाइक मेसेेंजर हे एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजिंग अ‍ॅप्लिकेशन आहे. जे २०१२ मध्ये लाँच करण्यात आले होते. स्टिकर्सला सपोर्ट करणारे हे अ‍ॅप विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. हे हाइकलँड नावाची एक व्हर्च्युअल सुविधा उपलब्ध करून देते. येथे युजर्स आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासह नवे मित्रही जोडू शकतात. याशिवाय यातील बिग स्क्रीन या थिएटरवर युजर्स शोदेखील बघू शकतात.

टिकटॉकएेवजी चिंगारी अ‍ॅप

चिंगारी शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप आहे. येथेे तुम्हाला ट्रेंडिंग न्यूज एंटरटेन्मेंट आणि असे काही शॉर्ट व्हिडिओजही मिळतील, जे डाऊनलोड करून शेअर करता येतील. तुमचा व्हिडिओ जेवढा तेवढे तुम्हाला पेमेंट मिळेल. हे अ‍ॅप युजर्सने अपलोड केलेल्या व्हिडिओला पॉइंट्स देते. नंतर हे रिवॉर्ड््सने बदलता येतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser