आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

व्हिडिओ चॅटिंग अॅप :‘झूम’ला अनेक बड्या तंत्रज्ञान कंपन्या टक्कर देणार

सॅनफ्रान्सिस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुक, गुगल, सिस्कोने आपल्या व्हिडिओ चॅट सेवा पुढे रेटल्या

माइक इसाक, शीरा फ्रॅन्केल

काेराेना प्रकाेपाच्या काळात व्हिडिओ चॅटिंग अॅप झूमच्या वाढत्या लाेकप्रियतेने अनेक दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष वेधले आहे. फेसबुक, गुगल सहित अन्य कंपन्यांनी देखील झूमला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे. अॅनालॅटिक्स कंपनी अॅप एनीच्या मते गेल्या महिनाभरात झूमचा डाऊनलाेड ७४०% ने वाढला आहे. दरराेज ३० काेटींपेक्षाही अधिक लाेक आमच्याशी जाेडले जातात, असा दावा झूमने केला आहे. महामारी फैलण्यापूर्वी ही संख्या १ काेटी हाेती. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना व्हिडिआे चॅटिंग अॅपवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची सूचना दिली आहे. तथापि, फेसबुकमधील सारे कर्मचारी झूमच्या वाढत्या लाेकप्रियतेवर खुलेआम चर्चा करीत असतात. अलीकडेच फेसबुकने व्हिडिआे काॅन्फरन्सच्या माध्यमातून व्हिडिआे चॅट फीचर आणि सेवेविषयी बरीच माहिती दिली. फेसबुक मेसेंजरवर ५० लाेकांसाठी व्हिडिआे ग्रुपचॅट, ८ लाेकांसाठी व्हाॅट्सअॅप व्हिडिआे काॅल आणि फेसबुक डेटिंगवर व्हिडिआे काॅल सामील आहे. फेसबुक मेसेंजर प्राॅडक्टचा वापर करीत झुकेरबर्गने सांगितले की, जगाने काेविड-१९च्या पूूर्वीच या दिशेने पावले टाकली हाेती.

‘झूम’च्या संदर्भात विचार करणारे केवळ झुकेरबर्ग एकटेच नाहीत. गुगलने देखील याच महिन्यात ‘मीट’ या व्हिडिआे चॅट अॅपला जी-मेल द्वारे अधिक सुरक्षित आणि साेपे बनवले आहे. सिस्काे या कंपनीने देखील टेलिकाॅन्फरन्स सेवा ‘वेबेक्स’चे अपडेट सुरू केले. ‘वेबेक्स’ झूम पेक्षाही अधिक सुरक्षित मानले जाते. गेल्या आठवड्यात ‘व्हेरिझाॅन’ने ‘ब्लू जीन्स’ हे व्हिडिआे काॅन्फरन्सिंग नेटवर्क विकत घेतले आहे. झूमला लक्ष्य बनवून दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या आपली अपार संसाधने या लहानशा परंतु वेगाने विस्तारत असलेल्या स्पर्धकाविरुद्ध कामी लावली आहेत. गेल्या वर्षी फेसबुक, गुगलने चीनच्या ‘टिकटाॅक’ या व्हिडिआे अॅपवर लक्ष दिले हाेते.

झूमचे प्रमुख एरिक युआन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची कंपनी स्पर्धकांविषयी अजिबात विचार करीत नाही. १०० वर्षांतील सर्वात माेठ्या संकटकाळातील युजर्स आणि त्यांचा अनुभव यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सिस्काेचे माजी अध्यक्ष असलेले युआन यांनी २०११ मध्ये झूमची सुरुवात केली हाेती. अॅपल अॅपस्टाेअरवर महिनाभरात सर्वाधिक डाऊनलाेड करण्यात आलेले हे अॅप आहे. या कंपनीचे मूल्य सुमारे ३.५८ लाख काेटी रुपये आहे.

0