Top News
 • पुणे- सोशल मीडिया ट्रेडच्या माध्यमातून व्यवसाय देण्याच्या आमिषाने नागरिकांची 3700 कोटी रुपयांची फसवणूक करणा-या नोएडातील हायप्रोफाईल आयुषी मित्तलला अखेर पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या. पुणे पोलिसांच्या मदतीने नोएडा एसटीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी महिला आयुषी मित्तल मागील काही दिवसांपासून फरार होती. याबाबतची माहिती अशी की, अनुभव मित्तल याने ऑगस्ट 2016 मध्ये सोशल मीडिया ट्रेडच्या नावाखाली व्यवसायाला सुरूवात केली होती. कंपनीच्या सदस्य होण्यासाठी पैसे आकारून ब्लेज इन्फो सोल्युशन नावाच्या संकेतस्थळावरील लिंक लाईक करण्यास भाग पाडले जात होते. ही लिंक लाईक करणा-यांना कमिशन दिले जात होते. पैसे मिळण्याच्या आमिषाने फक्त सात महिन्यात साडेसहा लाख लोक या कंपनीचे सदस्य झाले होते. सदस्यांकडून घेतलेल्या 3700 कोटी रुपयांचा अपहार त्यांनी केला होता. यातील मुख्य आरोपी अनुभव मित्तल याला उत्तर प्रदेश पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे. मित्तलसह एकूण सहा लोकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यातून अटक केलेली आयुषी मित्तल ही कंपनीची डायरेक्टर होती. घोटाळा उघडकीस आल्यापासून ती फरार होती. यूपी पोलिस तिच्या मागावर होते. अखेर तिला पुणे पोलिसांच्या मदतीने नोएडा एसटीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. पुढे स्लाईडद्वारे पाहा, या बंटी-बंटलीचे फोटोज...
  December 29, 10:28 AM
 • पंचक (जळगाव)-पंचक गावाजवळ(ता.चोपडा) 2 दुचाकींच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गणेश शांताराम पाटील (वय 29 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. ते जळगावहुन पंचकला परत येतांना गुरूवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा (वय 2 वर्षे) असा परिवार आहे. त्यांची पुतणी खुशी प्रदीप पाटील (वय 4 वर्षे) या अपघातात जखमी झाली आहे. तौफिक शेख मुख्तार (वय 28, रा. चिनावल, ता.रावेर अडावद, ता.चोपडा) यांचाही या अपघातात मृत्यू झाले ते लग्नासाठी आले होते. पुढील स्लाईडवर आणखी फोटो
  December 29, 07:02 AM
 • मुंबई- ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा ज्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) आधारे करण्यात आल्याचे आघाडी सरकारवर आरोप झाले होते. अक्षरश: त्याच धर्तीवर भाजप सरकारनेसुद्धा सिंचन घोटाळा केला आहे. तीन वर्षात फडणवीस सरकारने ३०७ सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिल्या आहेत. त्याची एकूण किंमत ४० हजार कोटींवर जाते. फडणवीस सरकारच्या सुप्रमा हासुद्धा राज्यातला मोठा सिंचन घोटाळाच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र सरकार ६० टक्के निधी देणार होते. ती रक्कम २० हजार कोटी होती. फडणवीस सरकारने त्यात वाढ करत ३२ हजार कोटी केली. मात्र वाढीव सुप्रमाच्या रकमेला केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. केंद्र सरकार मान्यता देत नाही म्हटल्यावर फडणवीस सरकारने नाबार्डच्या माध्यमातून पैसे खर्च केले, असा आरोप मलिक यांनी केला आहे. सुप्रमा वाढवण्याचा निर्णय ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी घेतला गेला. हे ठेकेदार भाजपचे आहेत. याचा अर्थ सुप्रमा हे सरकारचे नाटक होते. मूळ हेतू घोटाळ्याचा होता, असा दावा मलिक यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना वाढीव सुप्रमा यांना कडाडून विरोध केला होता. तसेच सुप्रमा हा सरळसरळ घोटाळा असल्याचे आरोप केले होते. मग सत्तेवर येताच तुम्हीसुद्धा तोच मार्ग कसा अवलंबला? भाजप सरकारच्या सुप्रमा या सिंचन घोटाळा नाहीत काय? याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. खडसेंचे स्वागतच माजी काँग्रेस नेते नारायण राणे यांना भाजपने काँग्रेस पक्ष सोडायला भाग पाडले, असे सांगत भाजप नेते एकनाथ खडसे जर भाजप सोडणार असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
  December 29, 06:20 AM
 • नवी दिल्ली- एलपीजी सिलिंडरचा दर महिन्याला ४ रुपये वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. हा निर्णय गरिबांना मोफत गॅस कनेक्शन पुरवण्याच्या सरकारच्या उज्ज्वला याेजनेत बाधा आणणारा होता. एलपीजी सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी हळूहळू कमी करून संपवण्याच्या उद्देशाने सरकारने दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना १ जुलै २०१६ पासून १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचा दर महिन्याला दर वाढवण्याची परवानगी कंपन्यांना देण्यात आली होती. सरकारने ही परवानगी दिल्यानंतर गेल्या १७ महिन्यांत सिलिंडरचा दर आतापर्यंत १९ वेळा ७६.५० रुपयांनी वाढला आहे. पुढील स्लाईडवर आणखी फोटो...
  December 29, 06:00 AM
 • नवी दिल्ली- बहुचर्चित तीन तलाक विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले. यात १४०० वर्षांपूर्वीची एका वेळी तीन तलाक देण्याची प्रथा गुन्हा ठरवनू ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. साडेचार तास चाललेल्या चर्चेदरम्यान विरोधकांची मांडलेले सर्व दुरुस्ती प्रस्ताव फेटाळले गेले. प्रारंभीपासून विरोध करणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ३ दुरुस्ती प्रस्ताव मांडले. पहिल्या-दुसऱ्या प्रस्तावाला केवळ २-२, तर तिसऱ्या प्रस्तावाला त्यांचे एकट्याचेच मत मिळाले. काँग्रेसच्या सुश्मिता देव, बिजदचे भर्तृहारी माहताब आणि माकपचे ए. संपथ यांचेही प्रस्ताव फेटाळले गेले. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, हा क्षण ऐतिहासिक असून मुस्लिम महिला (वैवाहिक हक्क संरक्षण) विधेयक महिलांची प्रतिष्ठा व सन्मानाचे रक्षण करेल. काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी तीव्र विरोध केला. विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची या पक्षांची मागणी सरकारने फेटाळली. विधेयकात चार अत्यंत मोलाचे मुद्दे - हा कायदा फक्त एकाच वेळी तीन तलाक म्हणजेच तलाक-ए-बिद्दतवर लागू होईल. हा अवैध व दखलपात्र गुन्हा असेल. - तलाक देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. तीन वर्षांपर्यंत शिक्षेसह दंडही ठोठावला जाईल. रक्कम मॅजिस्ट्रेट ठरवतील. - तोंडी, ईमेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेज वा कोणत्याही माध्यमातून दिल्या जाणाऱ्या तीन तलाकवर हा निकाल लागू आहे. - पीडित महिला स्वत: तसेच तिच्या अल्पवयीन मुलांसाठी पालनपोषण व पोटगी भत्ता मागू शकते. मुलांच्या ताब्याचीही विनंती करता येईल. - कायदामंत्री म्हणाले - पीडित महिलांची बाजू घेणे गुन्हा असेल तर आम्ही तो १० वेळा करू तीन तलाकमुळे महिलांवर अन्याय, तरी संसदेने का शांत राहायचे : प्रसाद रविशंकर प्रसाद, कायदामंत्री सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी तीन तलाकला बेकायदेशीर ठरवले होते. परंतु त्यानंतरही ते सुरूच आहे. महिलांवर अन्याय होत असेल तर संसदेने शांत का राहायचे? इस्लामिक देशांमध्ये तीन तलाकवर नियमन आहे, मग धर्मनिरपेक्ष देशात का नाही? राजकारण, दल, धर्म आणि व्होट बँकेच्या पलीकडे जाऊन या निर्णयाकडे पाहावे. मीनाक्षी लेखी, भाजप खासदार शाहबानो प्रकरणानंतर १९८६ मध्ये काँग्रेसने बनवलेला कायदा महिलांना मिळणाऱ्या पोटगीच्या विरोधात होता. जर तीन तलाक झाला तर दोन्ही पक्षांत करार कसला? लोकांची दिशाभूल करणाऱ्या मुल्ला-मोलवींच्या विरोधात कायदा बनने गरजेचे आहे. एम.जे. अकबर, विदेश राज्यमंत्री ४० वर्षांपासून मुस्लिम महिलांच्या अधिकाराबद्दल ऐकत आहे. विधेयकामुळे इस्लामला धोका नाही. ऑल इंडिया मुुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा सरकारचा कटच, कायदा मंजूर झाल्यास महिलांवर अन्याय : ओवेसी असदुद्दीन ओवेसी, एमआयएम : विधेयक घटनाबाह्य आहे. मुस्लिमांना तुरुंगात टाकण्याचा कट होत आहे. कोणत्याही देशात ३ तलाक गुन्हा नाही. विधेयक मंजूर झाल्यास महिलांवर अन्याय होईल. याबाबत मुस्लिमांशी चर्चा केली नाही. मल्लिकार्जुन खारगे, काँग्रेस सरकारसोबत आहोत, मात्र त्रुटी दूर कराव्यात. एकमतासाठी विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवावे. सुश्मिता देव, काँग्रेस दंगलीत ३ वर्षांची शिक्षा होते, मात्र तलाकमध्ये का? पती तुरुंगात असेल, जामीन न मिळाल्यास भत्ता देण्यास राजी होईल? सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी: आमचा विधेयकाला पाठिंबा आहे, मात्र सर्व कौटुंबिक वादांना गुन्ह्याच्या श्रेणीत आणले जाऊ शकत नाही. धर्मेंद्र यादव, सप सरकार इतका महत्त्वाचा कायदा करण्यास घाई का करत आहे? हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जावे. जामिनाचा अधिकार न्यायाधीशांकडे गरीब मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे राहणे गुन्हा असेल तर १० वेळा हा गुन्हा करणार असल्याचे कायदामंत्री म्हणाले. पतीला पोलिसांकडून जामीन मिळू शकणार नाही. जामिनाचा निर्णय न्यायाधीश घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. प्रस्तावित कायदा पती-पत्नीच्या संबंधांना आणखी प्रगाढ करेल. विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी महिलांची मदत करावी, जेणेकरून कुटुंबाची भरभराट होईल. -शाईस्ता अंबर, अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्ड हे विधेयक अत्यंत घाईघाईत आणले आहे. त्याविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देऊ. तूर्तास न्यायालयात अपील करणार नाही. - मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी, प्रवक्ते, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुढे काय विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल. तेथे सरकारकडे बहुमत नाही. एनडीएचे ८०, यूपीएचे ९५ आणि इतर पक्षांची संख्या ६३ आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला ५७ सदस्य असलेल्या काँग्रेसवर अवलंबून राहावे लागेल.
  December 29, 05:57 AM
 • जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या सत्कार साेहळ्याच्या कार्यक्रमात गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दाेघे एकाच व्यासपीठावर अाले हाेते. मंत्रिपद गमावल्यामुळे भाजपवर नाराज असलेल्या खडसेंना या वेळी अामदार पाटील यांनी राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यावर अापल्या मनातील भावना अजितदादांना सांगितली, असे सांगून खडसेंनी अापल्या राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला. अजित पवार व खडसेंच्या भाषणाचा संक्षिप्त वृत्तांत त्यांच्याच शब्दांत... माझ्या मनातील भावना मी अजित पवारांच्या कानात सांगितली : खडसे माझ्या राजकीय वाटचालीची अनेकांना चिंता वाटतेय. मात्र अाज मी काहीच सांगणार नाही. केवळ अजित पवार यांच्या कानात मी ते सांगितले अाहे, मात्र ते तुम्हाला काेणालाही कळणार नाही. मी केवळ पक्षवाढीसाठी अाजवर काम केले. पदाची लालसा असती तर माझ्या ४० वर्षांच्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या संधीसाठी अापण कधीच भाजपला लाथ मारून बाहेर पडलाे असताे, असे खडसेंनी नमूद केले. सध्या राज्यभर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून प्रचार केला जात अाहे. अजितदादा, असला प्रचार तुम्हीच हस्तक्षेप करून थांबवा. कारण अातापासूनच तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा प्रचार केला तर उगीच तुमच्या मागे चाैकशा लागतील, असा वडिलकीचा सल्ला खडसेंनी दिला त्यावर एकच हशा पिकला. एकनाथ खडसेंच्या कानगाेष्टीने भाजपची झाेपच उडेल : पवार अाम्ही सत्तेत असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी विराेधी पक्षनेता म्हणून केलेले काम, त्यांचा राजकीय संघर्ष खराेखरच वाखाणण्याजाेगा अाहे. ते अाणि मी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत एकत्रित येत असताे. त्यामुळे अाजच्या कार्यक्रमाकडेही जनतेने वेगळ्या नजरेने पाहू नये. खडसेंनी त्यांच्या मनातील ज्या भावना माझ्या कानात सांगितल्या अाहेत त्या खडसेही तुम्हाला सांगणार नाहीत व मीही सांगणार नाही. मात्र खडसेंच्या या कानगाेष्टींमुळे भाजप शिवसेनावाल्यांना अाज झाेप लागणार नाही हे मात्र नक्की, असा टाेला अजित पवार यांनी लगावला. पुढील स्लाईडवरआणखी फोटो...
  December 29, 05:25 AM
 • पुणे- खराडी येथे एका भटक्या कुत्र्याने दीड वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. खराडी येथे राहणाऱ्या अण्णा गाडेकर यांची ही चिमुरडी आहे. ती अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की चिमुकलीच्या डोळ्याचा काही भाग बाहेर आला होता. या चिमुकलीवर येरवडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डोळ्यावर करावी लागली शस्त्रक्रिया या चिमुकल्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमी झाल्या आहेत.या घटनेनंतर येरवडा परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत महापालिका कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत या मुलीच्या उपचारावर जवळपास 60 हजार रुपये खर्च झाल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो
  December 28, 21:12 PM
 • कोल्हापूर- पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा कारणावरून आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरण कंपनीच्या सहकार्याने कोल्हापूर महापालिकेचा वीज पुरवठा सकाळी 11.30 ते 12.30 यावेळेत खंडित केला. त्यामुळे कोल्हापूर मनपाची अब्रू वेशीवर आली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील एकूण 12 नाल्यांमधून शहराचे मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते, याबाबत विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करून आवाज उठवला आहे.तरीही या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता डोळेझाक करणाऱ्या कोल्हापूर मनपाला दोषी मानून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला पंचगंगा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने कोल्हापूर मनपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र वीज वितरण कंपनीने कारवाई केली नव्हती, आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीचे अधिकारी जितेंद्र सोनवणे यांना या प्रश्नी धारेवर धरत जाब विचारला. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्यात आली आणि मनपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईची चर्चा महापालिका चौकात आणि संपूर्ण कोल्हापूर शहरात दिवसभर सुरू होती.
  December 28, 19:42 PM
 • औरंगाबाद- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सिल्लोड येथे आज (गुरुवार) दुपारी मोठा मासा अडकला आहे. उपविभागीय अधिकारी अनिल गोविंदराव माचेवाड (वय-42) यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. माचेवाड यांच्यासह त्यांचा सहकारी रत्नाकर माहादू साखरे (वय-52) यालाही अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराची वडीलोपार्जित कूळ जमीन (29 एकर 21 गुठे) मोजे चादापूर याबाबत तहसिलदार यांनी दिलेल्या निर्णयवर फिर्यादीने केलेल्या अपिलावर स्थगिती देणेसाठी अनिल माचेवाड यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणजेच 10 हजार रुपये 28 डिसेंबरला देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याबाबत दिलेल्या तक्रारीवरून अधिकार्यांनी सापळा रचून उपविभागीय अधिकारी माचेवाड यांना सिल्लोड येथे रंगेहात अटक केली होती.
  December 28, 18:38 PM
 • नवी दिल्ली - एअर इंडियाची अवस्थाही विजय माल्ल्या यांच्या बंद पडलेल्या किंगफिरप्रमाणे होऊ नये असे वाटत असल्याचे वक्तव्य हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केले. राजू म्हणाले की, एअर इंडिया सुरू राहावे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू नये असे आम्हाला वाटते. एअर इंडिया 50 हजारांपेक्षा जास्त कर्जात बुडालेली आहे. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू - मंत्री राजू म्हणाले की, एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. - त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, बेरोगजारी वाढावी असे कोणालाही वाटत नाही. एअर इंडियाची अवस्था किंगफिशरसारखी व्हावी असे आम्हालाही वाटत नाही. आम्हालाही असे वाटते की त्यांनी देशाची सेवा करत राहावे आणि अधिक उंच उड्डाण घ्यावे. अरुण जेटलींच्या नेतृत्त्वात निर्गुंतवणुकीचे काम सुरू राजू यांनी सांगितले की, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वात मंत्र्यांचा दर्जा असलेली एक समिती निर्गुंतवणुकीवर काम करत आहे. एखाद्या खासदारांना काही सल्ला द्यायचा असेल तर या शिष्टमंडळाला द्यावा. 52 हजार कोटींच्या कर्जात बुडाली एअर इंडिया - करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या एअर इंडियाबाबत सरकारच्या थिंक टँक पॉलिसी कमिशनने पूर्ण खासगीकरणाचा सल्ला दिला आहे. - एअर इंडियावर सुमारे 52 हजार कोटींचे कर्ज आहे. 2012 मध्ये यूपीए सरकारने दिलेल्या 30 हजार कोटींच्या बेलआऊट पॅकेजवर त्यांचा कारभार सुरू आहे. - किंगफिशर एअरलाइन 2003 मध्ये विजय माल्ल्यांनी सुरू केली होती. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन (डीजीसीए) ने ऑपरेशन्समधील त्रुटींमुळे त्यावर कारवाई करत ती बंद केली होती. किंगफिशर डिफॉल्टर जाहीर - किंगफिशर एअरलाइन्सला वेगवेगळ्या बँकांच्या 9000 कोटींच्या कर्ज प्रकरणी डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे. - कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेले विजय माल्ल्या देशातून फरार झाले आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये आहेत.
  December 28, 18:35 PM
 • मुंबई- गेल्या तीन वर्षांत १८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर तसेच अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना क्लीनचिट मिळत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी भ्रष्ट मंत्र्यांना क्लीनचिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते. नवाब मलिक म्हणाले, समृद्ध महामार्गाची जबाबादारी असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यांची चौकशी करू. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीने सरकारच्या प्रथेप्रमाणे त्यांना क्लीनचिट दिली व त्यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात आले. समृद्धी महामार्ग हा सर्वात मोठा घोटाळा असून समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम सनदी अधिकारी करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. हा समृद्धी महामार्ग काही अधिकारी, भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग आहे. त्यामुळे ते काम सुरुच रहावे यासाठी मोपलवार यांची तिथे नियुक्ती करण्यात आली, असेही ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती आहे, असा दावाही मलिक यांनी केला.
  December 28, 18:15 PM
 • मुंबई-गतवर्षी अंडर-16 क्रिकेट खेळताना 1009 रन्सची खेळी करून रातोरात स्टार झालेला प्रणव धनावडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रणवने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बेकार फॉर्मला वैतागला बेकार फॉर्मला वैतागून क्रिकेट खेळणे बंद केले आहे. प्रणवचे वडील एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत. प्रणवने जेव्हा ही शानदार खेळी केली होती तेव्हा तो रातोरात क्रिकेटच्या विश्वात स्टार बनला होता. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला प्रत्येक महिन्यात 10 हजार रूपयांची स्कॉलरशीप देण्याची घोषणा केली होती. पण आता प्रणवने खेळण्यास नकार दिला आहे. ​प्रणवच्या वडीलांनी लिहिले एमसीएला पत्र प्रणवच्या वडीलांनी एमसीएला एक पत्र लिहून त्यात म्हटले आहे की, आता प्रणवला दिली जाणारी स्कॉलरशीप बंद केली जावी. जर तो पुन्हा फॉर्ममध्ये आला तर त्याची स्कॉलरशीप सुरू करावी. तेव्हापर्यंत ही स्कॉलरशीप बंद करावी. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
  December 28, 17:33 PM
 • इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्याशी भेटीनंतर त्यांच्या आई आणि पत्नीबरोबर पाकिस्तानच्या पत्रकारांनी गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. पाकिस्तानच्या माध्यमांनीत या पत्रकारांवर टीका केली आहे. द डॉन न्यूज पेपरचे हसन बिलाल जैदी यांनी ट्विटरवर लिहिले, रिपोर्टर्स दोन्ही महिलांना टोमणे मारत होते घोषणा देत होते. त्यांनी या महिलांचा संबंध मारेकऱ्याशी जोडला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकारांना धन्यवाद देत म्हटले, - जॉब वेलडन. पत्रकारांनी त्यादिवशी फार वाईट वर्तन केले. सोमवारी जाधव आणि त्यांच्या आई तसेच पत्नी यांच्यामध्ये सुमारे 47 मिनिटे भेट चालली होती. पाक माध्यमांनीच केली टीका.. WION न्यूजचे तहा शाह सिद्दीकी म्हणाले, माझ्या सहकारी पत्रकारांनी जे केले त्या गोष्टीची मला फार घृणा वाटते. कधी-कधी आम्ही असा स्टोरी करतो ज्यांची घृणा येत असते. हा असाच दिवस होता. पण त्याचे कारण मी न्यूज केली हे नाही. तर कारण म्हणजे, माझ्या इतर पत्रकार मित्रांनी एका आई आणि पत्नीबरोबर कसे वर्तन केले, यामुळे. परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर येताना त्यांना मारलेले टोमणे हा अत्यंत लज्जास्पद प्रकार होता. पत्रकारांना पत्रकारितेची मुल्ये शिकवावी PAK चे पत्रकार गुल बुखारी यांनी ट्वीट केले, न्यूजरूम कृपया आपल्या रिपोर्टर्सना रिपोर्टिंगची मुल्ये शिकवा. हे अत्यंत लज्जास्पद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हे स्वीकारता येणार नाही. ज्येष्ठ महिलांना त्रास देणाऱ्यांसाठी शब्दही नाहीत PAK मीडियाचे बेनझीर शाह म्हणाले, माझ्या त्या पाकिस्तानी पत्रकारांसाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, ज्यांनी एका 70 वर्षांच्या महिलेला असे सुनावले. त्यांना कदाचित देशभक्तीचा हाच मार्ग योग्य वाटला असावा. पुढे वाचा, सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलेल्या निवेदनात काय म्हटले..
  December 28, 17:17 PM
 • काबूल - येथील पश्चिम परिसरातील शिया कल्चरल अँड रिलीजियस ऑर्गनायझेशनवर एक आत्मघातली हल्ला झाल्याची बातमी आहे. त्यात किमान 40 लोक मारले गेल्याची आणि 30 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, मृतांची संख्या अधिक वाढली आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, कार्यक्रमाच्या कार्यालयात मीडिया ग्रुपचे सदस्य चर्चा करत असताना हा हल्ला झाला. - स्थानिक तोलो न्यूजने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने 40 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 30 जण जखमी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. - अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या मते, मारल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश महिला, मुले आणि पत्रकारांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तीन ठार - तोला न्यूजनुसार, या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय सध्या आप्तेष्ठांचा शोध घेत आहेत. - प्रेसिडेंट अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा मानवते विरोधातील गुन्हा असल्याचे म्हटले आहे. मेमध्ये झालेल्या हल्ल्यात मारले गेले होते 90 जण - याचवर्षी मे महिन्यात काबूलमधील भारतीय दुतावासाजवळही हल्ला झाला होता. त्यात जवळपास 90 जण ठार झाले होते. 300 हून अधिक जखमी झाले होते. जुलैत कार ब्लास्टमध्ये झाले होते 24 ठार - गुलाई दावा खाना परिसरात 24 जुलै ला आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात 24 जण ठार झाले होते. तर 42 जखमी झाले होते. गेल्यावर्षी सर्वाधिक हानी - यूएन असिस्टंस मिशन इन अफगानिस्तान (UNAMA) च्या रिपोर्टनुसार गेल्यावर्षी अफगाणिस्तानात हल्ल्यांमध्ये 3498 लोकांचा मृत्यू झाला होता. 7920 जण जखमी झाले होते. म्हणजे एकूण 11418 जणांची हानी झाली. गेल्या आठ वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. 2015 च्या तुलनेत यात 2% वाढ झाली होती. - UNAMA च्या रिपोर्टनुसार यावर्षी मार्चपर्यंत अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राइक आणि दहशतवादी हलल्यात 715 जणांचा मृत्यू झाला होता. 1466 जण जखमी झाले होते. अमेरिकन सैन्य आल्यानंतर वाढल्या अडचणी - दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिका आणि विदेशी सैन्य अफगाणिस्तानची मदत करत आहे. - सध्या येथे 8400 अमेरिकन सैनिक आणि 5000 नाटो सैनिक आहेत. त्यांचे मुख्य काम सल्लागार म्हणून काम करणे असे आहे. - सहा वर्षांपूर्वीपर्यंत येथे एक लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक होते. 2011 ते 2013 पासून अमेरिकन लष्कर आल्यापासून येथील हल्ल्यांत वाढ झाली आहे.
  December 28, 14:39 PM
 • नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत ख्रिसमस पार्टीनंतर एका मॉडेलवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सतीश आणि जग्गी अशी आरोपींची नावे असून तिसरा आरोपी हरेंद्र फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना सरोजनी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. पीडित तरुणीने भोजपुरी अल्बममध्ये काम केले होते. मुंबईत झाली होती आरोपीशी ओळख... - दिल्लीतील जामिया नगरात राहाणारी 20 वर्षीय पीडितेने सांगितले की, एक आरोपी तिचा परिचित आहे. मुंबईत त्याच्याशी ओळखी झाली होती. - 24 डिसेंबरला आरोपीने तिला वसंतकुंज येथे ख्रिसमस पार्टीसाठी बोलावले होते. पार्टी झाल्यानंतर आरोपीने तिला आरके पुरम सेक्टर-13 मधील एका फ्लॅटमध्ये नेले. नंतर आरोपीचे दोन मित्रही तिथे आले. सर्व दारु प्यायलेले होते. तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. सकाळी पीडितेने पोलिसांना फोन करून माहिती दिली. - सरोजनी नगर पोलिस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिस तिसर्या आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... अल्पवयीन मुलीवर बलात्कार...
  December 28, 12:47 PM
 • नवी दिल्ली - काँग्रेसचा आज (गुरुवारी) 133वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने राहुल गांधींनी प्रथमच काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. राहुल गांधींनी यावेळी संविधानाविरोधात दिल्या जाणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी टीका केली. ते म्हणाले की, भारताने संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले होते. इतिहासाकडे वळून पाहता, संविधान तयार करणे हा अभिमानाचा क्षण होता. पण आज भाजपचे वरिष्ठ सदस्य याच्या विरोधात होलत आहेत. भाजप राजकीय फायद्यासाठी खोटे बोलते. राहुल गांधींचा रोख.. भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. संविधानातून आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवू शकतो असेही ते म्हणाले होते. हेगडे यांच्या वक्तव्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ जाल्याचेही पाहायला मिळाले होते. हेगडेंचे स्पष्टीकरण.. दरम्यान गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हाही या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला होता. त्यावर हेगडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. मीच काय पण कोणताही नागरिक संविधानाचा अवमान करू शकत नाही. भारताचे संविधान आणि बाबासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. माझ्या वक्तव्याने कोणी दुखावले असेल तर मला माफी मागायला काहीही हरकत नाही, असे हेगडे यावेळी म्हणाले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज सुरू झाले. आणखी काय म्हणाले राहुल.. - राहुल गांधी म्हणाले की, संविधानाचे संरक्षण ही काँग्रेस पक्षासह सर्व भारतीयांची ही जबाबदारी आहे. देशात आज जे काही घडत आहे ते योग्य नाही. पण आम्ही एकजुट होऊन लढू. संविधान या देशाचा पाया आहे आणि हा पायाच धोक्यात आहे. भाजपचे नेते विविध वक्त्यांनी थेट संविधानावर हल्ला चढवत आहेत. - राहुल म्हणाले की, देशात बनावटपणाचे जाळे पसरवले जात आहे. भाजप या बेसिक आयडियावर काम करते की, राजकीय फायद्यासाठी खोटेपणाचा वापर करता येतो. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. असे होऊ शकते की आपण चांगली कामगिरी करणार नाही. कदाचित आपला पराभवही होईल. पण आपण सत्याची बाजू सोडायची नाही.
  December 28, 12:25 PM

FLICKER