गुजरात / 60 फूट लांब ब्रिज अचानक कोसळले, 12 जण जखमी

Oct 07,2019 3:17 PM IST

जूनागड - गुजरातच्या जुनागड येथे रविवारी 60 फूट लांब ब्रिज अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेत 4 कार पुलावरून थेट नदीत फेकल्या गेल्या. तसेच 12 जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुल कोसळल्याने 500 मीटर पर्यंतचा रस्ता खचला. काहींच्या मते, पावसामुळे पुलाखालच्या पायाची झीज झाली आणि त्यामुळेच अख्खे पुल कोसळले.