दिव्य मराठी प्रतिज्ञा / जळगावातील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल मधील 2600 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Feb 14,2020 12:31 PM IST

जळगाव - प्रेमच आहे संस्कृतीचा सारांश आणि अभ्युदयाची आशा एकमेव. प्रेमाच्या चुकीच्या कल्पना आणि वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहाण्याची मानसिकता यामुळे राज्यात भयंकर घटना घडत आहेत. ‘दिव्य मराठी’;ने ‘व्हॅलेंटाइन डे’;च्या निमित्ताने आरंभलेल्या या अभियानाला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत हजारो तरुण-तरुणींनी प्रतिज्ञा करत प्रेमाचा नवा अर्थ जगाला सांगितला. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल मधील 2600 विद्यार्थ्यांनी मी फुलराणी जाळणार नाही अशी शपथ घेतली.